ads header

शिवराज्याभिषेकाची व्याप्ती देशभर पोहचवल्याचे समाधान : वसंतराव मुळीक

 सतरा वर्षांपूर्वी २००६ साली राज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा व्हावा या हेतूने आम्ही कोल्हापुरातील सर्व धर्मीय, समाज बांधव तसेच वेगवेगळ्या विचारधारा असणारे शिवप्रेमी कार्यकर्ते यांना एकत्र करत मी आणि इंद्रजित सावंत अशा दोघांनी बैठकीचे आयोजन केले.




राज्याभिषेकाचे मोल आणि महत्व जगभर पोहचवायचे असेल तर  राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे ६ जून यादिवशी होणे आवश्यक आहे,

तसेच तिथीप्रमाणे राज्याभिषेक करण्यात खालील अडचणी आहेत.

• तिथीप्रमाणे राज्याभिषेक करणे म्हणजे दरवर्षी तारखेत बदल होऊन मे व जून महिन्याच्या मागेपुढे तारखा येतील.

• तिथितसुद्धा भारताच्या  दक्षिण, मध्य, व उत्तर प्रांतात ३ वेगवेगळी पंचाग असलेने या तारखेत एकसुत्रता राहणार नाही.

• मिरग (मृग) आणि मकर संक्रांत दोन्ही सणाची ६ जून व १४ जानेवारी असते त्या तारीखमध्ये कधी बदल होत नाही. मिरगानंतर पुढील किमान चार ते पाच महिने 

पावसाळी हंगाम असलेने अखंड सुरक्षिततेचा विचार छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक करवून घेताना निश्चितच केला असाही विचार पुढे आला.

 • तीन तीन शिवजयंतीचा वाद असताना पुन्हा राज्याभिषेक सुद्धा तारीख तिथीच्या वादात न अडकवता ६जून रोजीच राज्याभिषेक करण्याविषयी या बैठकीत एकमत झाले.


शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी सर्वांना सोबत घेत मराठा महासंघ पुढाकार घेईल व ६ जून रोजी राष्ट्रीय सण म्हणून  राज्यभर व्याप्ती होण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले.


त्यानंतर गेली १७ वर्षे आम्ही सातत्याने शिव-राज्याभिषेक ताकदीने साजरा करीत आहोत.


आज या दिवसाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

या सोहळ्यात आम्ही आजपर्यंत

• रायगड किल्ल्याच्या छायाचित्राचे प्रदर्शन,

• विविध स्पर्धा,

• आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकारांपासून ते नवोदित चित्रकारांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवरायांच्या  चित्राच्या २ लाख पेक्षा जास्त प्रति छपाई करुन आजपर्यंत राज्यभर वितरीत केल्या आहेत.

• शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला

राज्यातील जेष्ठ व दिग्गज विचारवंतांना निमंत्रित करीत राज्याभिषेक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करत असतो.

• याच बरोबर मराठा महासंघातर्फे ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक मिरवणूकीचे आयोजन करण्यात येते.

या मिरवणुकीला सर्वपक्षीय व विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उत्फूर्त उपस्थित असतात.

डॉल्बी व व्यसन विरहित या मिरवणुकीत फक्त शिवरायांच्या विचाराचा जागर करण्यावर भर असतो.


आम्ही २००६ पासून कोल्हापुरात तारखेनुसार शिवराज्याभिषेक सुरू केल्यानंतर सन २००८ पासूनच किल्ले रायगडावर ६जून 

रोजीच शिवराज्याभिषेक सोहळा  होत आला आहे .यासाठी सुद्धा कोल्हापूरच्या शिवप्रेमींनी,इतिहास संशोधक इंद्रजित सावंतच्या  पुढाकाराखाली घेतलेले परीश्रम कारणीभूत ठरले आहेत.


ज्या कोल्हापूरला मराठ्यांच्या राजधानीचा मान मिळाला होता त्या नगरीतील शिवप्रेमींच्या प्रयत्नाने आज देशभर शिवराज्याभिषेकची व्याप्ती वाढली, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.


हा सोहळा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून आपला वाटा उचलू शकलो या गोष्टीचे पुरेपूर समाधान आपणास लाभत आहे.


 गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने  ६ जून रोजी शिव स्वराज्य दिन ग्रामपंचायतीपासून सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्याचे आदेश काढले.

त्याची अंमलबजावणीही झाली असताना पुन्हा तारीख तिथी चा वाद सुरू होत असेल तर ही घटना मनाला वेदना दैणारी आहे. 

जगभर सर्व व्यवहार तारखेनुसार होत असताना तसेच आपण स्वातंत्र्य दिन,राज्य स्थापना दिन ते अगदी आपले वाढदिवस सुद्धा तारखेप्रमाणे करीत असू तर, या देशाला हजारो वर्षांनंतर गुलामगिरीतून स्वातंत्र्याची पहाट दाखविणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा तारखेप्रमाणे एकाच दिवशी व्हावा यात दुमत असण्याचे कारण नाही. 


म्हणून मी शिवप्रेमींना आवाहन करू इच्छितो कि, पुढीलवर्षी होणार्‍या ३५० व्या सोहळ्याची व्याप्ती जागतिक पातळीवर पोहचवली तरच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि वीरतेचा वारसा आपण अभिमानाने सांगू शकू.


Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा