मराठा वनवास यात्रा
शक्तिपीठ तुळजापूर ते मंत्रालय मुंबई!
प्रस्थान - 06 मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी दिनी तुळजापुरातून प्रस्थान....
आगमन- 06 जून श्री शिवराज्याभिषेक दिन, आझाद मैदान, मुंबई येथे आगमन राज्याभिषेक सोहळा इथेच साजरा केला जाईल.
विषय:- 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या एकमेव उद्देश प्राप्ती साठी 'मराठा वनवास यात्रा'
ज्या प्रकारे प्रभू श्रीरामचंद्र यांना गादीवर बसण्याचा हक्क असताना देखील वनवास भोगावा लागला. अगदी त्याच प्रकारे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याचा हक्क आला असताना देखील आज पर्यंत मराठ्यांचा वनवास सुरूच आहे.
वास्तविक पाहता मंडल आयोगाने महाराष्ट्रात सर्व ओबीसींना मिळून 14% च आरक्षण दिले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी अचानक आरक्षणाची मर्यादा वाढवली. मराठ्यांच्या हक्काचं जे 16% शिल्लक आरक्षण होतं ते इतर समाजात वाटप केल्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला. त्यानंतर कुणाचेही काढून न घेता 'मराठा आरक्षण' असा प्रोपोगांडा पसरवला गेला. आणि मराठ्यांचा दरवाजा चुकीच्या पद्धतीने बंद केला गेला. वास्तविक आमचाच हक्क जो दुसऱ्यांना वाटून टाकला तो आम्हाला परत मिळवायचा आहे. आम्हाला आमचा वनवास मिटवायचा आहे.
तो सुरू असलेला वनवास मिटवण्यासाठी, गाव खेड्यातला वंचित मराठा समाज प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात घरा बाहेर पडणार आहे. मराठवाड्यात एक समृद्ध परंपरा वारकरी संप्रदायाने जोपासली आहे. गावोगाव मारुती च्या पारावर रामायण ग्रंथ वाचला जातो. त्यात जेंव्हा लक्षमणाला शक्ती लागण्याचा प्रसंग येतो. त्याच्या आसपास काहिदिवस गावातील काही तरुण जुटच्या गोण्यांचे वस्त्र बनवून 14 दिवस दुसऱ्या गावांच्या शिवारातफिरतात. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होते. तीच जुनी समृद्ध परंपरा महाराष्ट्रासमोर पुन्हा नव्याने आणत मराठ्यांच्या मागण्यांसाठी त्या परंपरेचा सुयोग्य वापर करून जनजागृती केली जाणार आहे.
या वनवास यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे धग जगासमोर आणली जाणार आहे. राज्यकर्ते सद्ध्या विविध यात्रा काढण्याच्या बेतात आहेत. सरकार पक्षातील एक सावरकर सन्मान यात्रा काढतोय, एक धनुष्यबाण यात्रा काढणार आहे. विरोधातला कुणी कोरडे महाप्रबोधन यात्रा काढत आहे तर कुणी मशाल यात्रा काढणार आहे. परंतु वरीलपैकी कोणत्याच यात्रेचा उद्देश महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा सोडवण्यासाठीचा नाही. ज्या आरक्षणासाठी मराठ्यांनी शेकडो बलिदान दिले त्याबाबत कोणतेच राज्यकर्ते बोलत नाही. कमालीची उदासीनता त्यांच्याकडून दाखवली जात आहे. म्हणून मराठा समाजाने आपला आरक्षणाचा वनवास कायमचा मिटावा यासाठी वनवास यात्रा आयोजित केली आहे.
जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण भेटणार नाही, तोपर्यंत मराठा मैदानातून हटणार नाही. दिल्ली बॉर्डर वर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कायदे मागे घेण्यासाठी झुकवले.... आता मराठे राज्य सरकारला 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण कायदा बनवायला मजबूर करणार.....
महाराष्ट्रातील मराठा समाजाने आरक्षणासाठी शेकडो बलिदान दिले. परंतु तरी देखील समाजाला आरक्षण काही भेटले नाही. सर्वोच्च न्यायालयात दोन वेळच्या सरकारांनी दिलेले आरक्षण रद्द झाले. आज मराठा समाजाच्या हातात केवळ सरकारांनी दिलेले आश्वासनांचे सुकलेले गाजर तेवढे राहिले आहे.
यापूर्वी समाजातील काही अभ्यासक आणि नेत्यांनी विरोधकांशी आतून हातमिळवणी करत छुपा अजेंडा राबवल्यामुळे समाजाचा घात झाला. अशी भावना आज मराठा समाजाच्या कोट्यवधी तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठ्यांचा लढा आता समाजातील निष्ठावंत जागृत तरुणांनी हाती घेतला आहे.
या आधी समाजाने देखील आरक्षण बाबत आपली स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. परंतु काही महिन्यांच्यापूर्वी ता. कळंब, जिल्हा धाराशिव, या गावी लाखोंचा मोर्चा आयोजित करून 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण अशी स्पष्ट सांविधानिक भूमिका जाहीर केली. त्यानंतर तीच भूमिका ता. शिरूर कासार, जिल्हा बीड व तसेच परंडा जिल्हा धाराशिव येथे देखील तश्याच पद्धतीने लाखों च्या साक्षीने 50% च्या आतल्या हक्काच्या आरक्षणाची भूमिका घेतली. त्यामुळे 'मराठा क्रांती मोर्चा' ने देखील आता 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या अधिकृत भूमिकेचा स्वीकार केलेला आहे.
तीच अधिकृत भूमिका घेऊन समाजाच्या वतीने येत्या काही दिवसांत आगळ्या वेगळ्या आणि तीव्र जनआंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यात,...
1)आरक्षण म्हणजे नेमके काय?
2) संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी.
3) आज पर्यंत राज्यकर्त्यांनी केलेली फसवणूक.
4) 50%च्या आत असलेला मराठ्यांचा हक्क.
5) राजकीय लोकांच्या अडचणी गैरसमज आणि त्यावर असलेले तोडगे.
6) 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण कसे मिळेल?
यावर जन जागृती केली जाईल. व लाखोंच्या संख्येने मुंबईवर धडक दिली जाईल. ही वनवास यात्रा मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही.
येत्या एक वर्षांत लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सरकार आणि विरोधकांना खिंडीत पकडण्याची यापेक्षा दुसरी मोठी संधी नजीकच्या काळात नाही. अशी रणनीती मराठ समाजाने आखली आहे...... अशी माहिती श्री यांनी दिली.
उठ मराठ्या जागा हो! वनवास यात्रेचा धागा हो
आपले विनीत
सकल मराठा समाज!.....
संपर्क क्रमांक-
योगेश केदार - 9823620666
प्रतापसिंह कांचन पाटील- +91 91757 36003
सुनील नागणे- 866-9253078
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा