मराठा तितुका मेळवावा ।
महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
असं शिवकालीन महंत रामदास स्वामी यांनी म्हटलेले आहे. पण आज रामदासी पंथाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या अनेक लोकांना मराठा या शब्दाचीच ॲलर्जी झाल्यासारखे झाले आहे. गेल्या शंभर दीडशे वर्षांमध्ये मराठा ऐवजी मराठी हा शब्द कधी रूढ झाला हे भल्या भल्यांना समजलं नाही. आणि साहित्य, नाटक, सिनेमा, आणि बोलीभाषेतून मराठी हा एक शब्द इतका रुजवला गेला की महाराष्ट्र आणि मराठा हे प्राचीन काळापासून जे समीकरण होते ते काही लोक मोडीत काढण्यामध्ये यशस्वी झाल्यासारखे दिसते. याचाच एक भाग म्हणून श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे कुळ हे मराठा नसून त्या कुळाचे मूळ हे उत्तरेतील उदयपूरच्या राजघराण्यातून आहे आणि शिवछत्रपती आणि भोसले हे रजपूत आहेत असं सांगण्याची लिहिण्याची अहमिका 19 व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. आज या गोष्टीने चांगलेच मूळ महाराष्ट्रात धरले आहे. पण खासा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा चरित्रकार कवींद्र परमानंद नेवासकर, महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज ही शिवकाळातील समकालीन व्यक्तिमत्व स्वतः मराठा म्हणून घेत होती का रजपूत म्हणून घेत होती? यावरून याचा निकाल आपण घेतला पाहिजे. याविषयावर मी केलेल्या अभ्यासाची थोडक्यात मांडणी "भोसले कुळाचा वंशवृक्ष" या आम्ही संपादित केलेल्या ग्रंथात केली होती. त्यातील काही महत्वाचा भाग या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. भोसले कुळ आणि पर्यायाने शिवछत्रपती मराठा असणे हे शिवाजी महाराज स्वतःच सांगतात. शिवाजी महाराजांच्या काळातील आणि शिवाजी महाराजांच्या लगतच्या काळातील अनेक कागदपत्रे हे भोसल्यांचं मराठात्व आणि महाराष्ट्रीय असण, महाराष्ट्रीय भूप असणं हे वारंवार अधोरेखित करतात. अस असताना आज सुद्धा काही मंडळी भोसले आणि शिवछत्रपती यांचं नातं राजपूतांशी जोडणे यात धन्यता मानतात. पण इतिहास याविषयावर नेमकेपणाने काय सांगतो? इतिहासाची संदर्भ साधने याविषयावर नेमकेपणाने काय सांगतात? हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.
28 - 12 - 2022
कोल्हापूर.Facebook Video
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा