ज्या चंद्रकांत पाटलांना तुरुंगात टाकायचे; त्यांच्यावर शाईफेक करून काय होणार?- शिवाजी कवठेकर
ज्याला तुरुंगात टाकायचे ; त्याच्यावर शाईफेक करून काय होणार?- शिवाजी कवठेकर
बीड दि.11(प्रतिनिधी):-मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाचे खूप मोठे अपराधी आहेत. त्याबद्दल त्यांना खरे म्हणजे मागेच तुरुंगात टाकायला पाहिजे होते.पण सरकारने काही त्यांच्यावर क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलेल्या आरोपांची दखल घेतली नाही. त्याउलट त्यांची पाठराखणही केली व मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावर कायम ठेवून त्यांचे प्रतिष्ठावर्धनही केले. पण सरकार म्हणजे काही न्यायालय नाही.त्यामुळे चंद्रकांत पाटलाच्या अपराधाकडे कानाडोळा करणारे सरकारही त्यामुळे खरे म्हणजे दोषी ठरते.म्हणून तुरुंगात टाकायला पाहिजे होते, अशा अपराधी मंत्र्यावर शाईफेक करून काय होणार? त्यामुळे पाटलांवर झालेल्या शाईफेकीचे कौतुक लोकांनी व माध्यमांनी करू नये, असे आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, 2017 मध्ये क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैसे चारून मराठा संघटनांमध्ये फूट पाडल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांवर सप्टेंबर मध्ये झाला होता. त्यानंतर औरंगाबादच्या एका समन्वयकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्या लाईव्ह प्रयत्नात त्या समन्वयकाने माझ्या आत्महत्येस चंद्रकांत पाटील व त्यांचे काही समर्थक कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.पण सुदैवाने वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने या समन्वयकाचे प्राण वाचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या समन्वयकास भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते, व त्याला आणि त्याच्या कुटुंबाला दिलासा दिला होता. रुग्णालयात भेटावयास आलेल्या मुख्यमंत्र्याकडे या मरता मरता वाचलेल्या समन्वयकाने चंद्रकांत पाटलांबद्दल व त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांबद्दल तक्रार केली होती.आणि चंद्रकांत पाटलांची नार्को टेस्ट करावी व त्यांना तुरुंगात टाकावे,अशी मागणी देखील मुख्यमंत्र्याकडे केली होती, असे वृत्तपत्रातून व प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते.आणि त्यामुळे, आता चंद्रकांत पाटलांसह त्यांच्या समर्थकांवर काय कारवाई होते याकडे सगळा समाज उत्सुकतेने पाहत होता. पण शिंदे-फडणवीस सरकारने सगळे उलटे करून टाकले.सरकारने चंद्रकांत पाटील व त्यांच्या समर्थक #क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर कारवाई करण्याऐवजी, चंद्रकांत पाटलांनी #मराठा समाजाच्या केलेल्या अपराधाचे सत्य ज्यांनी उजेडात आणले, त्या समन्वयकावर व मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्रामाणिकपणे काम करत असलेल्या काही कार्यकर्त्यांवर, त्या समन्वयकास आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. #चंद्रकांत पाटलांचा अपराध झाकण्यासाठी स्वतः शिंदे फडणवीस सरकारच खोटे गुन्हे दाखल करणारे अपराधी होण्यास तयार झाले.हे थोडे धक्कादायकच होते. पण सरकारने असे करायलाच पाहिजे होते. कारण असे करून सरकार आपला स्वतःचाच बचाव करत होते. म्हणजे क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैसे चारून संघटनेमध्ये फूट पाडण्याचा जो अपराध चंद्रकांत पाटलांनी 2017 मध्ये केला होता. म्हणजे ही जी काही बेईमानी मराठा समाजाबरोबर चंद्रकांत पाटलांनी केली होती. ती 2018 मध्ये 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण देऊन मराठा समाजाला फडणवीसांनी जे फसवले होते, त्याकरिता केली होती. म्हणजे 2018 मध्ये मराठा समाजाला फसवण्याकरिता फडणवीसांना समन्वयकांची, मराठा संघटनांची व समर्थन करणाऱ्या सर्व नेत्यांची, जी कुमक मिळाली होती ती सर्व चंद्रकांत पाटलांनी मिळवून दिली होती. आणि भारतात देताच येत नाही ते आरक्षण देऊन मराठ्यांना फसवण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले होते. आता विद्यमान सरकारमध्ये तेच उपमुख्यमंत्री आहेत. आणि फडणवीस यांच्या समर्थनावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.जे 2018 मध्ये चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असलेले मंत्री होते.म्हणजे हे सरकार मराठाविरोधी असलेल्या आणि मराठा समाजाचे गुन्हेगार असलेल्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व मंत्र्याचे सरकार आहे.म्हणून मग अशा परिस्थितीत हे सरकार मराठा समाजाचा थेट अपराधी असलेल्या चंद्रकांत पाटलांवर कारवाई करेल, असे समजणे बावळटपणाचे होते.आणि त्यामुळे या सरकारने चंद्रकांत पाटलांवर काही कारवाई तर केलीच नाही.उलट त्यांना आरक्षण उपसमितीवर कायम ठेवून त्यांचे प्रतिष्ठावर्धन केले.म्हणून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा मोठा अपराध केलेल्या चंद्रकांत पाटलांना खरे म्हणजे मागेच तुरुंगात टाकला टाकायला पाहिजे होते.पण या सरकारने त्यांची साधी चौकशीही केली नाही.म्हणून, अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व कपटकारस्थानी बुद्धी असलेल्या आणि मराठा समाजाचा शत्रू असलेल्या अपराधी चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीचे कौतुक करून काय साध्य होणार? त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचे कौतुक माध्यमांनी व लोकांनी करू नये, असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा