ads header

महाराष्ट्रातील मराठे ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?

 राजकारणातली पत, प्रतिष्ठाची महत्वकांक्षा समाजाच्या निर्मळ चळवळीत घुसली तर काय होते हे या लेखातून स्पष्ट झाले आहे. 
जरूर वाचा महाराष्ट्रातील मराठे ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?

ज्यांनी शिवरायांना शूद्र म्हणून राज्यभिषेक नाकारला, बहुजनाच्या रक्तातून उदयास आलेलेे स्वराज्य पुढे पेशवाईने कपटाने बळकावले

म.फुलेंच्या सत्यशोधकी चळवळीतून व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यातून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, या ब्राह्मणेतर नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्ता संपादन केली. मोठ्या भावाप्रमाणे जबाबदारीने गावगाडा हाकणारा मराठा समाज दलित आणि इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊन आधुनिक महाराष्ट्र् घडवला. महाराष्ट्राला फुले,शाहु, आंबेडकर हा पुरोगामी चेहरा दिला. पण एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा पेशवाईने भांडवलशाहीच्या हातात हात घालून पेशवाई स्थापन केली आहे आणि मराठा व दलित, बहुजनांना सत्तेतून बेदखल केलं आहे. छत्रपती संभाजी राजाच्या हत्येनंतर पेशव्यांनी शाहूला नाकर्ता म्हणून बाजूला सारले व मराठयांचे स्वराज्य बळकावून पेशवाई आणली. आज त्याच पद्धतीने पुरोगामी मराठ्यांना नाकर्ते ठरवून भटशाही चौखूर उधळत आहे.
विशेष म्हणजे संधी साधू मराठे ब्राह्मणाच्या ओंजळीने पाणी पीत आहेत ही शूर शिवरायांच्या महाराष्ट्रात अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 21 मराठा खासदारांना Position मिळाली पण Power नाही ते ब्राह्मणांच्या हातातील बाहुले बनलेत हे मागच्या पाच वर्षात सिद्ध झाले आहे. कारण यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, मराठा समाजाला अारक्षण मिळावे व हा कायदा संसदेत पास करून घेऊन घटनेच्या 9 व्या प्ररिशिष्टात टाकण्या साठी संसदेत कुणीही तोंड उघडले नाही.

कारण हे भाजप मधील मराठा खासदार ब्राह्मणाचे घरगडी म्हणूनच काम करत आहेत असेच दिसते, नव्हे त्यांना तसे करावे लागते कारण भाजप काय मराठयांच्या बापाचा पक्ष नाही तो ब्राह्मणाच्या बापाचा पक्ष आहे.
जर मागच्या 20 वर्षात मराठयांनी आपला पुरोगामी वारसा जपला असता व दलित आणि इतर मागास जातींना नेहमी प्रमाणे सोबत घेऊन स्वाभिमानी वाटचाल केली असती तर मराठा आज दिल्लीत प्रभावी राहिला असता. आज दिल्लीत गुजराती बनियाची सत्ता आहे त्यात महाराष्ट्र कुठेच नाही.

मागच्या टर्मला कुठल्या मराठा मंत्र्यांनी दिल्ली गाजवली? पूर्वी शरद पवार संसंदेत पाय ठेवताच देशभर दिसायचे पण मागच्या पाच वर्ष्यात मोदी गडकरी शहा सोडला तर इतर कोणाला तोंड उघडू दिल नाही. बहुजन प्रतिपालक शिवरायांनी महाराष्ट्रच्या मातीत आम्हा शूद्र अतिशूद्रांनच्या हातात तलवारी देऊन लढायला शिकवलं व भारतात आदर्श लोकशाही स्वराज्य निर्माण केलं तेच लोकशाही स्वराज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्थापन केले आहे पण आज या महाराष्ट्रातील थोर महामानवांचा लोकशाही विचार व संविधान आज पायदळी तुडवले जात आहे.

ज्यांच्या साठी संविधान निर्माण केलं त्या सामान्य माणसाची प्रचंड लूट करून देश भांडवलदारांच्या घशात घातला जात आहे. गेल्या 10 वर्ष्यात दोन लाख शेतकरर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कष्टकरी कामगार दलित यांचे जगणे अवघड झाले आहे.एक लाख कोटी चे बँक कर्ज बुडवे परदेशात मजा मारत आहेत. मुद्राच्या योजनेच्या नावाखाली देशाच्या तिजोरीतील करोडो रुपये गुजराती व्यापाऱ्यांना दिले गेले आहेत.

  शिवराय,फुलेशाहू आणि भीमरायानी जनकल्याणकारी स्वराज्य देशाला दिलं पण त्यांचा महाराष्ट्र आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षा नंतरही दिल्लीत वंचितच आहे. 70 वर्ष्यात महाराष्ट्रातील एक सुद्धा मराठा, बहुजन नेता प्रधानमंत्री झाला नाही व भविष्यात होईल असे दिसत नाही.

 जर झालाच तर फडणवीस गडकरी होईल संघ धोरण व पेशवाई चा झेंडा फडकवण्यासाठी व आपले सगळे मराठा बहुजन सगळे झेंडे हातात धरून मिरवन्यात धन्यता मानणार व शिवरायांचा मावळा पेशवाईचा भक्त होणार. कारण शरद पवारांची संध्याकाळ झाली आहे व मराठयांनी त्यांचा हात सोडून ते गडकरी व फडणवीसचे पाय चेपत आहेत.

शिवरायांच्या व जिजाऊंच्या बदनामी करणाऱ्या व मराठेशाही चा अस्थ कर्णर्यांची लाचारी पत्करणार महाराष्ट्राच्या नर्मदेचे पाणी गुजरात मध्ये वळवले जाते ,
 गुजराती व्यापाऱ्यांचा धंदा चालण्यासाठी 1 लाख 30 हजार कोटींची मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन झटक्यात सुरू होते.पण दूष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा विदर्भात एक सुद्धा सिंचनाचा प्रकल्प येत नाही. ज्या शिवराय भीमरायानी भारत देश घडवला त्यांचे स्मारक उभारणीला पाच वर्षात एकही कॉन्ट्रॅक्टर सापडत नाही पण 110 आदिवासी गावे उठवून 3000 कोटीचा सरदार पटेलांचा पुतळा वर्षभरात उभा रहातो. प्रधानमंत्री पद, पक्षाध्यक्ष पद, रिजर्व बँकेचे गव्हर्नर पद गुजराती लोकांच्याकडे जाते व महाराष्ट्र दिल्लीत कुठेच दिसत नाही. उलट महाराष्ट्रातील हजार एकर जमीन अंबानीच्या जिओला दिली जाते .महाराष्ट्र शासनाच्या शिवाजी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाली तरी 50 कोटी रुपये मिळत नाहीत पण काल स्थापन झालेल्या जिओ विद्यापिठाला 1000 कोटी दिले जातात. म्हणून अश्या परिस्थितीत असे वाटते की एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्रातील मराठा आज कुठे आहे?

ज्या गुजरातची एकही मिलिटरी रेजिमेंट देशाच्या रक्षणासाठी नाही पण देशाच्या रक्षणासाठी मराठा व महार या दोन दोन रेजिमेंट देणारा व देशासाठी सीमेवर प्राण देणारा महाराष्ट्र आज गुजराती शहा - मोदींच्या पायावर लोटांगण घालीत आहे ही शोकांतिका भारतीय मराठा, बहुजनांच्या इतिहासातील फार मोठी वैचारिक व राजकीय हानी आहे.
प्रा केशव पवार
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा