ads header

प्रशासकिय विभागात खुल्या प्रर्वगाच्या जागेवर इतर प्रर्वगातील उमेदवारांची नियुक्ती एक अन्याय

प्रशासकिय विभागात खुल्या प्रर्वगाच्या जागेवर इतर प्रर्वगातील उमेदवारांची नियुक्ती 
प्रशासकिय विभागात खुल्या प्रर्वगाच्या जागेवर इतर प्रर्वगातील उमेदवारांची नियुक्ती देऊन खुल्या प्रर्वगाच्या जागा बळकवण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून प्रशासनात सुरू आहे. त्यामुळे खुल्या प्रर्वगातील बहुसंख्याक मराठा समाजावर मोठा अन्याय होत आहे. त्याविषयी वेळीच दक्षता बाळगून दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नविन रोष्टर तयार करताना खुल्या प्रर्वगाच्या जागा कमी करण्यात येऊ नये, त्याच प्रमाणे 2017 साली आंरतजिल्हा बदलीने आलेले शिक्षक हे त्यांच्या बदलीने आलेल्या बिंदूवर दाखवावेत, तसेच खुल्या प्रर्वगाच्या जागेवर इतर प्रर्वगाच्या व्यक्तीला एकही सीट जाता कामा नये तसेच शिक्षण विभागातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात असे स्पष्ट शब्दात मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक तथा स्वराज्य सेना प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र निकम यांनी सुचेना केल्या . यावर प्रतिक्रिया देताना शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम म्हणाल्या की आपण निश्चिंत रहा रोष्टर हे योग्य रीतीने सर्व कागदपत्रे पडताळूनच तसेच कोणताही बाह्य हस्तक्षेप न होता अचुकपणे करण्यात येईल तसेच शिक्षण विभागातील रखडलेल्या पदोन्नत्या येत्या 10 ते 15 दिवसात मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.
याच विषयी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी घुले साहेबांना भेटून सदर विषयी निवेदन द्यायचे होते पण घुले साहेब पुण्याला गेले कारणांनी पुढील दिवसी दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सदर विषयी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली . यावर घुले साहेब बोलले की मी प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतला आहे धोरणात्मक निर्णय घेता येत नसले तरी तुमची रास्त मागणी आहे त्याचा नक्कीच विचार केला जाईल. 
यावर उपस्थित सर्वच समन्वयक म्हणाले की रोष्टर मध्ये काही चुकीचे घडले किंवा पदोन्नत्या देण्यास विलंब झाला तर याद राखा , मराठा क्रांती मोर्चा तर्फे मोठे आंदोलन केले जाईल.

याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्यसमन्वयक श्री. राजेंद्र निकम मुंबई- सातारा, श्री विवेकानंद बाबर राजधानी सातारा , श्री. विवेक कुराडे पाटील कराड, जिल्हा समन्वयक वैभव जाधव कराड यादी तसेच सातारा जिल्हातील समाज बांधव जातीनीशी दोन्ही दिवशी उपस्थित होते.

एक मराठा लाख मराठा !
#justiceformaratha
#marathacandidates
#marathakrantinewsnetwork
#mknn
#Applicationformarathayouth
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा