ads header

जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज !


जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज.

आहार हि युद्धातील दुर्लक्षित न करण्याची बाब आहे. हे शिवरायांनी चांगले ओळखले होते. पोटात अन्न नसेल तर सैन्य लढणार कसे ? पराक्रम करून विजय मिळविणार कसे ? म्हणून शिवराय आहाराच्या बाबतीत अगदी काटेकोरपणे वागत. जसे सैन्याच्या बाबतीत तसे स्वतःच्या बाबतीतहि काटेकोर असत. गनिमांचे सैन्य यातील जेवण खाण्यामध्ये- बराच फरक होता. गनीम आपल्या बरोबर विराट सैन्यासह लवाजमा घेऊन येत असे. म्हणजे शत्रूच्या सैन्यात, खाणे, पिणे, गाणे नाचणे इत्यादी सर्व काही गोष्ष्टी अगदी विलासीपणे होत असत. तर शिवरायांच्या सैन्यात खाण्यावर नियंत्रण होते. व मद्य पिणे, गाणे, नाचणे यावर पूर्ण बंदी होती. शिवरायांच्या सैन्यात - युद्धात जिथे उसंत मिळेल त्याच वेळी सहभोजन होत असे.एरव्ही सैन्याच्या जवळ कमरेला शेल्यात पुरचुंडीत बांधलेल्या शिदोऱ्या आणि पोहे असत.

ज्यावेळी भूक लागेल त्याच वेळी हेकमरेला बांधलेले सुकान्न सेवन करीत असत. म्हणजे सैन्य युद्धाला सैदैव तत्पर असे. शिवराय आपल्या सैन्याला नियमित वेतन देत असत. या शिवाय मोहिमेतील जेवणखाण्याचा खर्च सरकारकडून होत असे. शिवराय हि आहाराच्या बाबतीत अगदी काटेकोर असत. ते मिताहारी होते. युध्द किवा युद्धजन्य परिस्थिती नसेल त्यावेळी वेळच्या वेळी कमीत कमी जेवणे हा त्यांचा परिपाठ होता. अति अन्न सेवनाने शिथिलता येते. व उमेद संपते असे त्यांचे मत होते; आणि योग्यच होते. ह्या त्यांच्या मिताहारी पद्धतीने ते जवळ जवळ दिवसांचे २४ तासदेखील स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सतर्क असत. शिवराय जरी मिताहारी असले तरी ते उपवास -तापास कधी करीत नसत. 'उपवास करणारे अन्नाचे जास्त चिंतन करतात व काम थांबवितात . उपवास संपल्यावर एकदम भरपूर खातात. व खाऊन झाल्यावर सुस्त होऊन स्वस्त झोपतात.'असे शिवरायांचे मत होते.

शिवराय आपल्या मावळ्यानसोबत जेवत असत. जे अन्न मित्रांना , मावळ्यांना किंवा सैन्याला , तेच अन्न स्वतःसाठी घेत असत. कधी अन्नाचा आपपर भाव केला नाही. अन्नाच्या बाबतीत वर्णभेदहिकेला नाही. शिवराय कधी मेजवान्या झोडीत नसत. पण सहभोजन करीत असत. तसेच ते सर्व जाती धर्मातील सहकार्यांच्या घरी स्वतःच्या पंक्तीला जेवण देत असत. श्री सेन यांनी''traveler ऑफ देव्हनार and Karee''ह्या पुस्तकात शिवरायांच्या आहाराबद्दल म्हटले आहे , तो जेवतो पण , पण सर्वसाधारणपणे दिवसातून एकदाच. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली आहे,''

शिवरायांचा आहार साधा होता. म्हणून शिवरायांचे शरीर शेवटपर्यंत चपळ , उत्साही व निरोगी होते. युद्धात आहाराच्या बाबतीत दक्षता ठेवणे त्याला अतिशय महत्व होते. हे ओळखून त्यांनी स्वतःसह सैन्यात नियंत्रण व संयम ठेवला होता. म्हणून ते सदैव विजयी होण्याचे ते अव्यक्त असे कारण होते. आणि स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्या कृतीचा शिवरायांना चांगला उपयोग झाला.
लोककल्याणकारी राजा.

साभार - फेसबुक 
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा