1932 सालची गोष्ट आहे क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील हे शिक्षा भोगून सुटले होते पण रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचे बंधन होते. त्यांचे गाव येडे मच्छीन्द्र मधून कृष्णा नदी ओलांडून दिवसातून दोनदा येणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी इस्लामपूरताच राहण्याचे ठरवले .पण आर्थिक दृष्ट्या ते परवडणारे नव्हते कारण सरकारने घर व जमीन जप्त केली होती त्यामुळे तेथून काहीच उत्पन्न नव्हते म्हणून त्यांनी तालुका काँग्रेसकडे मदत मागितली त्यांनी ती दिली तर नाहीच वर अपमानच केला .
मग नानांनी हमाली करून राहण्याचे ठरवले पण तेथील माणुसकीची जाण असणाऱ्या गरीब हमालांनी त्यांना हमाली करू नका आम्ही सगळे मिळून तुमचा खर्च चालवतो असे सांगितले पण त्यांचे कष्टाचे पैसे आपल्यावर खर्च व्हावे हे नानांच्या बुद्धीला पटले नाही. म्हणून त्यांनी सरळ उघड्यावर झाडाखाली पारावर राहण्याचे ठरवले तेथे एकजण खाणावळ चालवत होता तो त्यांना सकाळ संध्याकाळ दोन भाकरी व भाजी आणून देत असे पण त्याच्याही मागे पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा लागल्याने त्यानेही हात आखडता घेतला .मग मात्र उपवास घडू लागले पण मकेची कणसे वगैरे खाऊन दिवस काढणे चालू होते. तशात अंगातील कपडे फाटून गेले व नवीन घेणे शक्यच नव्हते. जेथे खायला अन्नच नव्हते तेथे कपडे कोठून मिळणार ?म्हणून त्यांनी हमालाकडून एक पोते मिळवले व त्याच्या बंद बाजूला मध्ये एक भोक पाडले व बाजूला दोन भोके पाडून त्याचा सदरा केला व तोच घालून ते राहू लागले .काहीजणांनी तर पोतेबाबा म्हणून म्हणायला सुरुवात केली.
पॅरोल मिळेपर्यंत हाच सदारा ते घालत होते .कोणीतरी त्यांचा हा फोटो काढला व त्याची एक कॉपी त्यांना दिली.
पुढे कॉम्रेड प्रेमाताई पुरब नावाच्या कम्युनिष्ट कार्यकर्ती कडे गेल्यावर त्यांनी तो फोटो त्यांना दिला.
प्रेमताईंनी त्या फोटोचे मोल जाणून तो जपून ठेवला .नंतर तो प्रसिद्धी माध्यमांकडे आला .
संबंधित माहिती गुगलवर उपलब्द आहे.
असलं हे मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरिता प्रपंचाची होळी करणारे ,अफाट दारिद्र्य भोगलेले क्रांतिवीर खरे वीर भारतरत्न साठी कसे आठवत नाहीत?
आठवतात ते माफी मागून क्रातीवीरांचे पत्ते ब्रिटिशांना सांगणारे गद्दार व त्यापायी आयुष्यभर घरी बसून पगार घेणारे माफीविर .
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा