देवडी फाट्यावर आज दिनांक 12 रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान अपघात झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली. लोखंडी दुभाजक तुटून 50 मीटर पर्यंत ओढत गेला. गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
देवडी फाट्यावर आमची कॉर्नर बैठक सुरू होती. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण कसे देता येईल? यासंदर्भात मी माहिती देत होतो. पाठीमागे अचानक मोठा आवाज झाला. मागे वळून पाहतो तर गाडी उलटलेली दिसली. आम्ही सभा तत्काळ थांबवली अन् धावत जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. गाडीचे दरवाजे उघडून आतमध्ये असणाऱ्या लोकांना बाहेर काढले. काही लोकांचा जीव वाचवण्यात भूमिका निभावत आली त्याबद्दलचे वेगळे समाधान लाभले. असे योगेश केदार यांनी सांगितले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा