सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत असले बद्दलचा हळदवडे गावचा दसरा सिमोलंघन ग्रामसभे मधील सामूहिक निर्णय सामजिक कार्यकर्ते व ग्रा. प. सदस्य , बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव भराडे तसेच साताप्पा काशीद, केराबा अस्वले, बाळासो भराडे, डॉ. पवन भराडे , प्रविनभाई भराडे यांनी कागल तालुका सकल मराठा समाज संयोजीत हळदवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जाहीर केला. यावेळी उपस्थित सकल मराठा कागल कडून हळदवडे गावच्या सामूहिक निर्णयाचे अभिनंदन करून लवकरच याचे अनुकरण तालुक्यातील इतर गावांनी करावे असे अहवान करण्यात आले.
यावेळी बोलताना सकल मराठाचे तालुका समन्वयक अँड दयानंद पाटील- नंद्याळकर म्हणाले की, जालना जिल्हा अंतराळी सराठी गावात मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी रखडलेले आरक्षण मिळणे बाबत तमाम मराठी समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील गेली 41 दिवस सनदशी मार्गाने आंदोलन करत असून या बाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय होत नाही. अनेक मार्गाने शासन आंदोलन मोडून काढण्याच्या कुटील डावपेच करत आहे. त्यामुळे कागल तालुक्याच्या गावागावातून पदयात्रा ,रॅली द्वारे जनजागृती करून सकल मराठा समाज येत्या काळात मोर्चा, ठिय्या-साखळी आंदोलन , निदर्शने , आमरण उपोषण या मार्गाने उत्तरोत्तर शांततेच्या मार्गाने आंदोलन तीव्र करणार आहे याची गंभीर दखल शासनाने घ्यावी. यावेळी ओंकार पोतदार नामदेव भराडे यांनी मनोगते व्यक्त केली
तालुक्यातील सकल मराठा समाज , सर्वपक्ष, सर्व संघटना यांचे कार्यकर्ते यांचे उपस्थित मुरगूड येथे लवकरच साखळी उपोषण नियोजन बाबत शिवतीर्थ मुरगुड येथे रविवार २९ रोजी आयोजित केलेल्या बैठकीस परिसरातील सकल मराठा कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज मुरगुड यांनी केले.
यावेळी दगडूशेठ शेटके (मा. सरपंच करंजवने) ,भाऊ आंग्रे ,महादेव सुतार, आनंदा मोरे ,संभाजी भराडे, संभाजी अस्वले, सुनील भराडे , मयूर सावर्डेकर ,सर्जेराव भाट, शंकर अस्वले ,संजय चव्हाण ,अनिल बैलकर, पांडुरंग इंदलकर, सागर इंदलकर ,आनंदा मोरे ,नामदेव कुरळे, केरबा रेडेकर ,मंगेश पवार, जीवन कांबळे, प्रकाश सावंत (बानगे) संजय भारमल, संतोष भोसले, , अभिजीत मिटके, रणजित मोरबाळे, युवराज सूर्यवंशी,विजय संपकाळ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार भागवत शेटके यांनी मांडले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा