#आणखी #एक #माफीनामा
आधी मराठा समाजाला टोकाचा विरोध करायचा.मराठा मुलांचे भवितव्य #उध्वस्त करायचे आणि मराठा समाजाने रोष जाहीर केला की हे मी केलेलंच नाही म्हणून भुमिका घ्यायची.
डॉ. तन्मय व्होरा 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' या संस्थेचे सदस्य असून 'मराठा आरक्षणातून झालेली भरती रद्द करा' असे पत्र डॉ. वोरा यांनी संस्थेद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात लढाई लढायला सुरुवात केली आहे. तसेच मराठा समाजाचा आरक्षण विरोधात दाखल असलेल्या याचिकेसाठी वोरा यांची ही संस्था विरोधी वकिलांना करोडो रुपये पुरवत आहे असा आरोप करुन मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आज डॉ. वोरा यांच्या दसरा चौक परिसरातील सूर्या हॉस्पिटल येथे आंदोलन केले. सतत मराठा आरक्षण विरोधात भूमिका घेणाऱ्या व वक्तव्य करणाऱ्या डॉ.वोरा यांना मराठा समाज हिसका दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
डॉ.तन्मय व्होरा यांनी मुख्यमंत्र्यांना २०१३ आणि २०१४ च्या एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेऊ नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वोरा यांना जाब विचारला. मराठा समाज कार्यकर्त्यांनी दवाखान्यात ठिय्या आंदोलन केले. मराठा आंदोलक-डॉक्टरांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. डॉक्टर तन्मय वोरा यांनी आंदोलकांची माफी मागितली.
पण या धनदांडग्या परप्रांतियांकडून विशिष्ट समाजाशी हातमिळवणी करुन मराठा समाजाला already #damage तर केलं गेलंय.याची भरपाई कशी होणार?
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा