साडेतीन कोटी मराठ्यांची स्वयंघोषित जात पंचायत
सोलापूर -: महाराष्ट्रात निव्वळ मराठा म्हणून नोंद असलेल्या जवळपास 3.50 कोटी मराठ्यांची आता जात पंचायत झालेली असून त्या जात पंचायतीचे स्वयंघोषित मोजकेच पंच निर्माण केले आहेत. मराठा आरक्षणावरुन सध्या चालू असलेले राजकारण हे फक्त सत्ता प्राप्ती व आर्थिक प्राप्तीसाठी चालू आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याविना लाखोंच्या संख्येने निघालेल्या 58 मुक मोर्चाची दाहकता कमी होत आहे. याला कारणीभूत सध्या पुढे येणारे सर्वच नेतृत्व आहे. कालच्या बैठकीत उपस्थित भाजपच्या काळातील सरकारी समन्वयक आणि आता सत्ता बदलल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकारी समन्वयक झालेले लोकच काल बैठकीत उपस्थित होते. मराठा त्या मोजक्या समन्वयकापैकी किमान 5-6 समन्वयकांची सारथीचे संचालक आणि 4-5 समन्वयकांची अण्णासाहेब महामंडळाच्या संचालक पदी वर्णी लागेल. काहींना राज्यसभा तर काहींना विधानपरिषदेची लॉटरी सुधा लागू शकते. कालच्या बैठकीचा कार्यक्रम मराठा हिता पेक्षा, स्वत:च्या Back Bone Team व Back Up Team च्या हिता साठीच होता. गेल्या पंधरा दिवसातील घडामोडी बघितल्या तर मराठा आंदोलनातुन राजकीय स्वार्थ व आर्थिक स्वार्थ हेच चित्र स्पष्ट होत आहे.
नेते व समन्वयक निष्ठ अज्ञानी कार्यकर्त्यांनी इथे भुंकू नये. अन्यथा क्रांती मोर्चातुन कोट्यावधीची आर्थिक उन्नती केलेल्या समन्वयकांची पुराव्यासह ईडी आणि इन्कम टॅक्सकडे तक्रार करून सर्वांना उघडे पाडेन.
त्यामुळे मला विरोध करण्याआधी स्वत:च्या नेत्याचा व समन्वयकाचा विचार करा.
महाराष्ट्रभर झालेल्या सर्व मोर्चाव्दारे समन्वयकांने केलेली आर्थिक उलाढाल जवळपास 200-300 कोटीची आहे. त्यामुळे मी ईडीकडे सुधा तक्रार देवू शकतो. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहू द्या. उगीच सर्वसामान्य मराठ्यांचा विश्वासघात करू नका. नाहीतर एकदा ईडी लागली की सीडी सुधा लागेल तुमची.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा