एक क्रांतिकारक निवडणूक
कोल्हापूर : पुणे पदवीधर निवडणूक लागली आणि संपूर्ण देशाने या निवडनूकीच्या विजयाचा जल्लोष केला. कारण ही निवडणूक भारतीय जनता विरुद्ध भांडवलदार-शेटजी-भटजी लढली गेली. मग्रूर उत्तान संस्कृतीच्या विरुद्ध वारकरी संप्रदयाची सत्शील चित्तवृत्ती अशी ही लढली गेली. भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांच्या वाड-वडिलांनी रक्त सांडलं, घरावर तुळशी पत्र ठेऊन स्वातंत्र्य संग्राम लढला त्यांच्या विरोधात ब्रिटिशराणी व्हीकटोरियाला सलामी देणाऱ्या माफीवीर, भारतात राहून तिरंग्याचा अपमान करणाऱ्या चड्डी बहाद्दर ब्रिटिश खबरी अशी ही ऐतिहासिक लढाई स्वातंत्र्यानंतर तब्बल 72 वर्षांनी झाली आणि त्यात सत्य धर्माची विजयी गुढी अरुण गणपती लाड या क्रांती अग्रणीच्या बहाद्दर सुपुत्राने रोवली.
जेंव्हा जनता स्वतः निवडणूक लढते तेंव्हा विजय जनतेचा होतो हे त्रिवार सत्य आहे. ही स्वतःची लढाई म्हणून पदवीधरांनी लढवली. सर्वात महतत्वाचे म्हणजे ही निवडणूक मतपत्रिकेवर लढली गेली म्हणूनच EVM हॅक करता आले नाही असा ठाम विश्वास जनतेला आला.
क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड यांनी सांगितले आहे, " देश स्वतंत्र झाला पण आमचा लढा संपला नाही. दीडशे वर्षे इंग्रजांनी देशाला लुटले. त्या अगोदर मुघल आणि इतरांनी देशाची खूप मोडतोड केली. त्यामुळे माझ्या देश बांधवांना अन्न, वस्त्र, निवारा, योग्य शिक्षण व हाताला काम, त्यांच्या शेतमालाला योग्य दर-दाम मिळेपर्यंत आम्हांला कसे स्वस्थ बसता येईल !"
त्यामुळे त्यांच्याच सुपूत्राने तब्बल 2 टर्म पराभव स्वीकारून ही बापूंच्या शब्दाला जागण्यासाठी लढण्याची उमेद कायम ठेवत हा जनता विजय प्राप्त केला.
गोळवलकर गुरुजींच्या मूळ विचारांच्यापासून कोसो दुर गेलेल्या देशद्रोही विचारांच्या चड्डी धारकांची जनतेने पुरती धूळधाण केली. कारण जनतेने त्यांना दोन वेळा संधी दिली होती. त्या संधीच त्यांनी पुन्हा एकदा पेशवाई आणि सर्व सामान्यांची लूट करून पेशवाईतील मोगलाई आणली होती.
अवघ्या जगाचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना त्यांनी पाठींबा दिला. १०७ लोकांचे हौतात्म्य देऊन मिळवलेल्या मुंबई महाराष्ट्र राज्याची चड्डी धारकांनी बदनामी करून गुजरातला सर्व प्रकल्प नेले. याचा राग सच्च्या मराठी माणसांत धुमसत होता.
जनतेला फक्त एक संधी हवी होती....एक लढवय्या नेतृत्व नेता हवा होता तो जनतेला "अरुण लाड" या स्वरूपात मिळाला. दस्तुरखुद्द क्रांतिकारकांचा मुलगा निवडणूक लढवतो आहे म्हंटल्यावर जनतेने सुद्धा डाव साधला आणि पेशवाईला-मोगलाईला लगाम लावला.
ह्या निवडणुकीमुळे देशात एक सकारात्मक विचार प्रसारित झाला की कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळे जनतेला पायाखाली तुडवू पाहणाऱ्या मनूच्या नादार औलादिला ही फटकार आहे.
अण्णांच्या कडून पदवीधरांच्या फार काही अपेक्षा नाहीत. ज्या आहेत त्या सहज साध्य व सोप्या आहेत. विद्यापीठात वेळच्या वेळी अभ्यास पुस्तिका मिळावी. परीक्षा झाल्यानंतर घरच्या पत्त्यावर पोस्टाने गुण पत्रिका व डिग्री प्रमाणपत्र मिळावीत. खाजगी कंपन्यांनी मूळ गुण पत्रिका व शैक्षणिक कागदपत्रे मागू नयेत. चुकीच्या पध्दतीने नोकरीतून काढून टाकू नये. टर्मिनेशन रेशो नूसार खाजगी कंपन्यांना दंड आकारावा इत्यादी.
अण्णा ही पदवीधरांच्या ह्या भोळ्या भाबड्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा