राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर काँग्रेस पक्ष काही व्यावहारिक धोरणानुसार संघटना चालवतो असे काही दिसत नाही. मुत्सद्दीपणा,दूरदृष्टी व धडाडी वगैरें गोष्टी तर फार लांबच राहिल्या. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यांच्या सहकार क्षेत्रात कर्तबगार असले तरी फारच भोळे वाटतात. औरंगाबादच्या नामांतर प्रकरणात त्यांचे निवेदन काय तर आमचा या बाबीला विरोध आहे.म्हणजे आग्या मोहोळ दिले उठवून.फक्त त्यांनी स्पष्टीकरण दिले असते की आमचे सरकार समान कार्यक्रमाशी बांधील आहे.इतर बाबतीत काही बोलू नका.बस् विषयच बंद करून टाकायचा होता.उलट भाजपला प्रति प्रश्न करायचा होता, तुमचे सरकार असताना काय दिवे लावले?
देशपातळीवर तर आणखीन वेगळीच त-हा.तामिळनाडूत पक्ष कमजोर आहे.तो वाढविण्यासाठी काही योजना राबविल्या पाहिजेत की नाही ? काय करावे त्यांनी? शंभर दीडशेवर उपाध्यक्ष व तेवढेच चिटणीस अशी जम्बो कार्यकारिणी निवडली. किर्ती चिदंबरींनी ह्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. म्हणजे कामही नको व कोणावर त्याची जबाबदारीही नाही. त्यांना विश्वासात घेतले असे दिसत नाही.कसा पक्ष चालायचा?
दुसरी बाब म्हणजे मराठा समन्वयक या संघटनेने थोरात यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारायचे आंदोलन चालविले आहे.
जेव्हा शिवाजी महाराजांची बदनामी पारिचारक व छिंदम यांनी केली तेव्हा हे मराठ्यांच्या नावाने राजकारण करणारे आंदोलक कुठे गेले होते ?
ह्या क्रांती मोर्चेवाल्यांमधला एक गट रा.स्व.संघाच्या इशा-यावरून चालतो असा संशय होता. पण आता तर खात्रीच पटली आहे.
नामांतर प्रकरण उकरून काढण्यात मोठे लांब पल्ल्याचे राजकारण आहे.मग अशा नावाची तर मोठी मांदियाळीच अस्तित्वात आहे. इस्लामपूर तरी का ठेवायचे ?
हैद्राबाद निजामाबाद ते सुद्धा काढून टाकावे. उत्तर प्रदेशात तर अशी भरपूर मुस्लीम संस्कृतीविषयक नावे आहेत.एक बाब लक्षात ठेवायला पाहिजे की या नामांतरामागे मुस्लीम द्वेषाचा दर्प जाणवतो.एकदा का ताजमहालाचे नामांतर तेजोमहाल झाले की हिंदूत्ववाद्यांचे घोडे गंगेत न्हाले.असा एकंदरीत माहोल दिसतो.
सुधाकर डुंबरे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा