ads header

अॅट्रोसिटीची धमकी देवून अत्याचार करणार्‍यावर कडक शिक्षा...!



अॅट्रोसिटीची धमकी देवून अत्याचार करणार्‍यावर कडक शिक्षा करण्याची तरतूद शक्ती कायद्यात करावी - योगेश पवार

सोलापूर - अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी देवून काही जातीयवादी मानसिकतेचे पुरुष व युवक, महिला-युवतींचा विनयभंग करून जबरदस्तीने अत्याचार करतात. अॅट्रोसिटी केससची अशी धमकी देवून विनयभंग/अत्याचार करणार्‍या आरोपीस कमीत-कमी 14 वर्षे व जास्तीत जास्त नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद करावी. आणि अश्या गुन्ह्यात महिला व युवतींना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी सुधारणा शक्ती कायद्यात करण्याची सूचना छावाचे योगेश पवार यांनी शासनाकडे केली आहे.

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा