मराठी तरुणांनाच आपले सरकार केंद्र द्याअन्यथा आंदोलन : मराठा समाजाचा इशारा
मुंबई : जिल्हा सेतू समितीतर्फे आपले सरकार केंद्र वाटप करताना स्थानिक मराठी बेरोजगार तरुणांनांच द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाइल असा इशारा देत मराठा क्रांतीतर्फे जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई उपनगर जिल्हयात आपले सरकार केंद्र नियुक्त करणे बाबत जाहीरात देण्यात आली आहे. सदर केंद्र देताना स्थानिक मराठी बेरोजगार तरुणांचा विचार करण्यात आलेला नाही. अमराठी परप्रांतीय नागरिकांना केंद्र देण्यात आले आहे. आपले सरकार केंद्र सुशिक्षित होतकरु मराठी बेरोजगार तरुणांनाच मिळायला हवे परंतु परप्रांतीय, राजकीय, डॉक्टर, वकील, सीए, फोटो स्टुडीओवाले, रिपेअर दुकाने, एकाच कुटुंबात पती पत्नी यांनाही केंद्र देण्यात आली आहे. काही ठिकाणी छोटया जागेतही केंद्र देण्यात आले आहेत. अशाने सुशिक्षित होतकरु गरीब मराठी बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळणार ? आपले सरकार केंद्र देताना मराठी बेरोजगार तरुणांचा विचार करताना १५ वर्षाचा स्थानिक दाखला आवश्यक करावा. जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समितीतर्फे ८६ आपले सरकार केंद्र वाटप करताना स्थानिक मराठी बेरोजगार तरुणांनाच द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विलास सुद्रिक बलराम भडेकर यांच्यासह अन्य पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा