मेगाभर्तीमूळे तब्बल सुमारे १००० ते २५०० लोकांना रोजगार मिळणार...
कोल्हापूर : अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च अँड इन्फरर्मेशन इन्स्टिट्यूट® ही संस्था ३० डिसेंबर २०१० मध्ये रजिस्टर्ड झाली असून राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यांत सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर विभागातील ही एकमेव अराजकीय- अशासकीय संस्था आहे, जीचे कार्यक्षेत्र सम्पूर्ण ग्रामीण भारत देश आहे. पंतप्रधान मोदींच्या कृपेने ३७० कलम हटविलेमुळे आता जम्मू आणि काश्मीर सुद्धा जोडलेले आहे.
संस्था मुख्यत: महिला सबलीकरण, पत्रकारिता-चित्रपट व प्रसारमाध्यम शिक्षण, साहित्य-नाटय, अर्थ-उद्योग इत्यादि विषयांत कार्यरत आहे.
१) ड्रीम ऑफ माय मदर...
२) लेट अमरसिंह ऑल भारत मीडिया लिटरेसी कॅम्पेन
३) सफल आर्थिक साक्षरता मिशन
हे संस्थेचे यशस्वी झालेले उपक्रम आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्यात अंदाजे किमान २१० लाख असंघटित छोटे उद्योजक-व्यावसायिक-दुकानदार महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणात-विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अंदाजे ५० हजार कोटींची उलाढाल यांमुळे होते असा कयास आहे. हे व्यावसायिक विविध जाती-पंथाची असून यात अशिक्षित-सुशिक्षित सर्वच जण आहेत. याच लोकांना सुयोग्य मार्गदर्शन, शक्य ती वैध मदत केल्यास महाराष्ट्र राज्याच्या विकासात ही मंडळी किमान १ ते २ लाख कोटींची भर घालू शकतील असा सार्थ विश्वास संस्थेचे संस्थापक अमरसिंह राजे यांना वाटतो. या धाडसी व क्लीष्ट उपक्रमाला राज्यातील सुप्रसिद्ध उद्योजकांनी दुजोरा दिला आहे.
"एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ" हा संदेश जगातील पहिली कर्ज माफी करणारे आद्य बँकर, आद्यउद्योजक जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी दिला आहे.
याच संदेशाला शिवप्रमाण मानून राजेंनी "महाराष्ट्र उद्योजक संघाची" स्थापना केली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून किमान २ कोटी लघुउद्योजक-व्यावसायिक-दुकानदारांना प्रोत्साहन मार्गदर्शन करण्याचा विडा उचललेला आहे. सर्व प्रथम महाराष्ट्र राज्यातील ३५७ तालुके, २७५०० ग्रामपंचायती मध्ये एकाच वेळी काम सुरुवात करण्यात येत आहे.
प्रत्येकाने हे देशकार्य-समाजकार्य म्हणून सहभागी व्हावे, असे प्रतिपादन राजेंनी केले आहे.
या उपक्रमाला सार्थ यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थेत मेगाभर्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तब्बल सुमारे १००० ते २५०० लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामूळे कोरोनोमुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जात असताना ह्या उपक्रमामुळे राज्यातील चाणाक्ष होतकरू व गरजू तरूण-तरुणींना हक्काची कायमस्वरूपीची नोकरी मिळणार आहे. जसे काम तसे दाम या तत्वावर एकूण ३ वर्षाच्या कामगिरीवर सदर उमेदरवाराला संस्थेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून ऑर्डर काढली जाणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा