न्यूनगंडातून आलेले हिंदुत्व आणि याच मुळे वैदिक काळातली वैदिक दहशत बहुजन विसरू शकत नाही कारण---सध्या जन्माने अब्राह्मण परंतू अंगात मात्र कडवा ब्राह्मण्यवाद, अशा भंगार बहुजनांच्या झुंडीच्या झुंडी निर्माण होत आहेत. त्यांना थोपविने जिकिरीचे परंतू आवश्यक आहे. कारण ही बाटगी मंडळी सर्वाधिक असहिष्णू आहेत..
हे भंगार बाटगे कोण ?
स्वातंत्र्य मिळाल्यावर ९० टक्के बहुजन समाज खेड्यांमध्ये मातीच्या घरात राहत होता. कुळाने शेती कसत होता. शेठ सावकाराकडून कर्ज काढत होता व त्याच शेठ सावकाराला स्वस्तामध्ये शेतमाल विकत होता. गव्हाची पोळी आणि भात हे त्याच्या दृष्टीने चैन होती. सणासुदीला फक्त मोठ्या मुश्किलीने ही चैन तो करू शकत होता. अशात पोराबाळांना शिकवायचे बळ त्याच्यात कसे असणार ?
मुठभरांकडे दसरा दिवाळी साजरी व्हायची. हा मात्र थंडी पावसात शेतात पडलेला असायचा. संविधानातील समाजवादी धोरणामुळे जमीन सुधारणा कायदे आले. कुळ कायदा आला. जमिनीचा स्वमालकीचा तुकडा मिळाला. सहकारी पतसंस्थांमुळे काही प्रमाणात सावकारावरचं अवलंबित्व कमी झाल. बँकांचे राष्ट्रीयकरण झाले गोर गरिबांना गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या साठी कर्ज मिळू लागले. कर्ज मिळणे तर दूरच पण त्या आधी बिगर सहकारी बँकात शिरायची पण त्याची हिम्मत नव्हती.
या सगळ्या धोरणांना भारतातील उजव्या पक्षांचा विशेषतः जनसंघाचा विरोध होता. कारण यातून ज्या शेठ सावकारांचे नुकसान होणार होते तेच जनसंघाचे पाठीराखे होते. गावागावात अनुदानित शाळा आल्या. परिवहन मंडळाची बस खेड्यापाड्यात पोहोचली. आता या शोषितांची मुलं मुली शिकू लागली, त्यांना नोकऱ्या मिळू लागल्या, ते शहरात राहू लागले.
आणि मग या प्रतिगामी लबाडांनी त्यांना पेटवायला सुरुवात केली. मध्यम वर्गात प्रवेश केल्यावर त्याच्या पुढे नवीन प्रश्न उभे होते. पण या सनातनी लबाडांनी त्याचं सुलभीकरण केले. त्यांच्या या प्रश्नांना आधी अनुसूचित जाती मग मुसलमान जबाबदार असल्याचा समज पद्धतशीर पणे पसरवण्यात आला. त्यात भरीस भर म्हणून बाबा बुवांचे पिक आले. नारायण नागबळी, कालसर्पयोग असे विधी हे त्र्यम्बकेश्वरला जाऊन करू लागले. अष्टविनायक, साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन स्वामी इ. चे पद्धतशीरपणे उदात्तीकरण सुरु झाले... सत्यनारायण तर मानगुटीवरच बसला.
या लोकांना आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न पुरोगामी नेतृत्वाने केला पण या बिनडोक बाटग्यांनी सांकृतिक गुलामागिरी स्वीकारली. संभाजी भिडे सारखे नव नवीन नौटंकीबाज गुरुजी तयार झाले.
अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला हे रंगवून सांगणार पण कृष्णाजी कुलकर्ण्याचे शीर शिवबांनी उडवलं हे सांगणार नाहीत. जावळीचे मोरे अफजलखानाच्या बाजूने होते हे सोयीस्कर विसरणार आणि खंडोजी खोपड्याची गर्दन उडवली हे लपवणार... कारण या बाटग्यांचा बौद्धिक आळस यांना खऱ्या इतिहासापासून लांब ठेवतो, तो चिकित्सा करायला तयार नाही. कुणी तसा प्रयत्न केला तर ज्या शक्तींनी यांच्या शोषणाचे समर्थन आजवर केले आहे, त्यांचेच ऐकून बिनडोकपणे प्रबोधन करणाऱ्यावरच हल्ले करतो. संघ परिवाराने धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी त्याचा शिताफीने वापर करून घेतला व रामाचा शिडीप्रमाणे वापर करून आज सत्ता मिळवली. मग तर यांना माजच चढला...
फुले, शाहू, गांधी, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण ज्यांच्या मुळे यांना चांगले दिवस दिसले त्यांच्या टिंगल टवाळीला हे बाटगे टाळ्या वाजवू लागले... आरक्षणावर हे पोटतिडकीने बोलणार पण आरक्षण का दिलं गेलं याचा अभ्यास नाही करणार, हजारो वर्षाचे मंदिरं, शेतजमिनी, सध्या शिक्षणसंस्था, महामंडळे या ठिकाणच्या वारसाहक्काने आलेल्या आरक्षणावर बोलणार नाहीत...
सर्वात जास्त OBC समाजातील लोक यांचे बळी ठरलेत, या मुर्खांना वाटतं आपण BC, ST, NT पेक्षा श्रेष्ठ, आपलं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी हे रूढी, परंपरा पाळण्याचा देखावा करतात. गणपती, दहीहंडी असो की नवरात्र, दिवाळी चढाओढीने पैसा उधळून फाटक्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत आम्ही हिंदू, हिंदू म्हणुन बोंबलत असतात... हे हिंदुत्वच मुळात न्यूनगंडातून आलेलं असतं...
मुळात अती अल्पसंख्य असलेल्या या जातींना वाटतं की हिंदुत्वाचा टिळा लावून आपण सुरक्षित होऊ पण या बिनडोकांना हे कळत नाही की हा हिंदुत्वाचा टिळाच देशात अराजकता आणू पाहतोय. मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी तुमचा हकनाक बळी देतोय.
लक्षात ठेवा आजवर धार्मिक दंगलीमध्ये मरण पावलेल्या, जखमी झालेल्या, मालमत्ता गमावलेल्या लोकांची जाती-धर्म निहाय यादी काढा आणि तुम्हीच ठरवा की टिळा लावून उन्माद वाढवायचा की शाळेत घेतलेल्या "सारे भारतीय माझे बांधव आहेत" या प्रतिज्ञेला स्मरून गुण्यागोविंदाने रहायचे.
ही पोस्ट सर्व जाती-धर्माच्या धर्मांध लोकांना चेतावणी आहे, बाष्कळ टिका करायची की गंभीर दखल घ्यायची हे तुम्ही ठरवा.
-नंदकिशोर भारसाकळे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा