कराड (प्रतिनिधी) : अंदाजे इस ११२६ पासूनचा इतिहास असलेल्या ९६ कुळी मराठा घराण्यापैकी एक शाखा जगदाळे सरकार घराण्याची परंपरा असलेल्या तत्कालीन मसूर परगण्याचे देशमुखी असलेले श्रीमंत जगदाळे कुटुंबीय तब्बल ४०० वर्षाने कऱ्हाड तालुक्यातील मसूर या गावी एकत्र आले. जगदाळे सरकारांची ही १३वी पिढी एकमेकांना आज भेटली. मसूर गावाचे विद्यमान उपसरपंच श्रीमंत विजयसिंह जगदाळे यांनी या पाहुण्यांचा आदर-सत्कार व पाहुणचार केला.
मराठा क्रांती मुक मोर्चानंतर मराठा समाजाच्या पोरी-बाळींच्या सुरक्षेसाठी आणि मराठा समाजाच्या सर्वागीण विकासासाठी ९६ कुळी घराणी परस्पर हेवेदावे विसरून एकत्र येत आहेत. याची सुरुवात शिंदे-सरकारांनी केली. त्यानंतर जाधवर(जाधव), धारच्या पवारांनी कार्यक्रम केला. तसेच जगदाळे यांची एकी करण्याचा मानस अमरसिंहराजे जगदाळे यांनी मसुरच्या विजयसिंह जगदाळे यांचे समोर २०१६ साली व्यक्त केला होता. पण नंतरच्या काळात कोल्हापुरातील नैसर्गिक आपत्ती व COVID १९ लॉकडाऊन मुळे त्यात व्यत्यय आला. सरकारने नियम शिथील केल्यामुळे कागल तालुक्यातील बस्तवडे गावातील जगदाळे कुटुंबीय आपल्या मुळ गावी एकत्र आले.
३५० वर्षाचा इतिहास असलेल्या पाटील वाड्यात ही सस्नेह भेट जाहली. विजयसिंह जगदाळे यांनी वाड्याची परंपरा, धार्मिक षओडपचार, जगदाळे घराण्याचा कुळाचार, विजयादशमीचे औचित्य, घराण्याची सत्ता याचे महत्व सांगितले.
जगदाळे यांचा विशेष विजय ध्वज आहे असा उल्लेख असलेला शिलालेख कोरलेला आहे. कालमाने परत्वे अक्षरं अस्पष्ट दिसत आहेत.
मसूर परगण्याचे भाग्यविधाते श्रीमंत मानसिंगराव जगदाळे हे सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ, क्रीडा व शिक्षण विभागाचे सभापती म्हणून पद भूषवत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मसूर गावाचे नाव देशभर पोचले आहे. त्यांनीही आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून बस्तवडे गावाच्या जगदाळे कुटुंबीयांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिला.
चाचा महेश जगदाळे यांनी अमरसिंह राजे यांचा शाल, श्रीफळ व ५०० वर्षाहून जुने असलेल्या श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
या प्रसंगी जितेंद्र धर्माधिकारी, चंद्रकांत जगदाळे, अनिल जगदाळे, सचिन जगदाळे, विनायक जगदाळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा