ना.भुजबळांवरील आरोपांचा खुलासा करायला कोणीही ओबीसी नेता किंवा एकाही पक्षाचा कार्यकर्ता आला नाही...
विनोद आप्पा इंगोले यांनी केला सर्वांचा निषेध...
बीड दि.16(प्रतिनिधी):- ओबीसी आरक्षण लागु करतांना तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व मुख्यमंत्री शरद पवार यांना अंधारात ठेऊन ओबीसींना अव्वाच्या सव्वा आरक्षण लागू केले व राज्यातील 70 टक्के,साडेआठ कोटी लोकांचा विश्वासघात केला.असा आरोप,मराठवाडा राज्य संघर्ष समितीचे शिवाजी कवठेकर हे गेल्या महिन्याभरापासून करत आहेत. त्याचा खुलासा राज्य पातळीवरील ओबीसी नेत्यांनी करावा, या मागणीसाठी अ.भा.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद आप्पा इंगोले यांचे एक दिवसीय उपोषण आंदोलन संपन्न झाले,असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे कि,1994 ला राज्यात काँग्रेसचे शरद पवार सरकार असतांना व त्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांकडे मंडल आयोग लागु करून ओबीसी समाजाला शिक्षण,नोकरी व राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची जबाबदारी असतांना,त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून व मुख्यमंत्री शरद पवार यांना अंधारात ठेवून, राज्यात केवळ 6 टक्के असलेल्या ओबीसींना 54 टक्के दाखवून पात्रतेच्या नऊपट (900 टक्के) आरक्षण लागु केले,असा आरोप गेल्या महिन्याभरापासून प्रसिद्धीपत्रके व 4 दिवस उपोषणाचे आंदोलन करून, शिवाजी कवठेकर हे दररोज करत होते.पण ओबीसी आरक्षणात झालेल्या अपहाराबद्दल किंवा ना.भुजबळांवर त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल कोणी काही बोलले तर नाहीच,पण साधी त्याची ओळखही दिली नाही.असं वागणं मोठया नेत्यांसाठी निश्चितच शोभनीय नाही.कारण,प्रश्न कवठेकरांचा नाही तर आजही राज्याच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर असलेल्या ना.छगन भुजबळ यांच्या विश्वासार्हतेचा आहे, ज्याने 27 वर्षांपूर्वी राज्यातील खुल्या वर्गातील 70 टक्के(मराठा 33,अल्पसंख्याक 17 व ब्राह्मण,जैन,मारवाडी,लिंगायत व उच्चवर्णीय 20),साडेआठ कोटी लोकांचा विश्वासघात केला ;
आणि तो आता 27 वर्षांनंतर शिवाजी कवठेकर यांनी सर्वांच्या लक्षात आणुन दिला आहे. त्याबद्दल, खरे म्हणजे कवठेकरांचे सर्वानीच आभार मानायला हवेत.पण त्याऐवजी, जिल्ह्यातील सर्व नेते त्यांची दखल न घेता स्वतःला लपवून जिल्ह्यात वावरत आहेत,हे धक्कादायक आहे.तरी, शिवाजी कवठेकर जे काही म्हणताहेत त्यात खरे किती? व खोटे किती? याचा खुलासा राज्य पातळीवर काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी व सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजप यांनी करावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद आप्पा इंगोले यांनी शनिवार, दि.15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केलेले उपोषण आंदोलन संपन्न झाले.पण,या दरम्यान कोणीही ओबीसी नेता किंवा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप या राष्ट्रीय पक्षांपैकी कुठल्याही पक्षाचा एकही कार्यकर्ता आंदोलनाकडे साधा फिरकलासुद्धा नाही ; म्हणून त्या सर्वांचा निषेध करत असल्याचे विनोद आप्पा इंगोले यांनी पत्रकात म्हटले आहे.आणि तसेच, बीड जिल्ह्यातील लोकांनीही ओबीसी नेत्यांचे हे वागणे लक्षात ठेवावे असे आवाहनही केले आहे. तसेच, इंगोले उपोषणास बसल्यानंतर राज्यातील अनेक शहरांतून अनेकांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले व आपापल्या जिल्ह्यात या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी संपर्क केलेले कार्यकर्ते ना.भुजबळांबद्दल व आजही त्यांची पाठराखण करणाऱ्या ओबीसी नेत्यांबद्दल खुप संतापाने बोलत होते.या संपर्क करणाऱ्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील,मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोंढरे,उस्मानाबादच्या सौ.रेखाताई लोमटे, कराडचे विवेक कुराडे पाटील यांचा समावेश आहे.या आंदोलनादरम्यान उपोषणाच्या ठिकाणी अ.भा.मराठा महासंघाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष नारायणराव थोरात सर,बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गिराम, विद्यार्थी अध्यक्ष भागवत मस्के, संघटक भागवत बादाडे,क्रांती मोर्चाचे समन्वयक सीए बी बी जाधव, तालुका अध्यक्ष बापूसाहेब सोळुंके, सचिव प्रकाश तात्या शिंदे, वरवटी व आहेर धानारयाचे सरपंच बालासाहेब आबा इंगोले, उपसरपंच प्रदिप कोठुळे, प्राचार्य सोंडगे सर, शिक्षक संघटनेचे श्रीकांत बागलाने,युवराज मस्के,अशोक सुखवसे,छावाचे अध्यक्ष अशोक रोमन,अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे, तालुका अध्यक्ष शिवाजी हिंदोळे, जयदत्त इंगोले, खांडू इंगोले, विकास शिराळे,प्रा.शैलेश इंगोले, राजु इंगळे, देविसिंह शिंदे, संतोष कोठुळे, रामहरी बनसोडे, दत्ता शेळके, संतोष जोगदंड, अविनाश जाधव, यांच्यासह अनेकांनी आंदोलनकर्ते अ.भा.मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष विनोद आप्पा इंगोले यांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला,असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा