राजकीय लाचारी व प्रशासकीय जातिवादाने आणखी एका मराठा तरुणांचा बळी घेतला, आरक्षण धोरण आणि संधीची समानता यावर जोवर धोरण ठरत नाही तोवर राज्य शासनाने नोकर भर्ती काढून रोज तरुणांना आत्महत्या करायला लावणे थांबवावे.
अमर मोहिते हा मुळचा सांगली जिल्ह्यातील होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुणे शहरात आला होता. सदाशिव पेठेतील एका वसतीगृहात तो राहात होता.मराठा आरक्षण रद्द झाल्यावर *काही दिवसांपूर्वी झालेल्या पीएसआयच्या फिजिकल परीक्षेतून तो बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याला नैराश्य आले होते. त्यातच कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
🪔भावपूर्ण_श्रद्धांजली
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा