बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने आम्ही गेलो असता ग्रामीण भागातील शिवणकाम करणाऱ्या महिला,शेतकरी व आत्महत्याग्रस्त माय माऊल्या यांनी उन्हातान्हात काबाड कष्ट करून कमावलेली एक दिवसाची रोजंदारीची रक्कम जमा करून आज आमच्या दौऱ्यासाठी दिली
'राजे,तुम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी लढतात.आम्ही तुमच्या सोबत आहोत अश्या भावना व्यक्त केल्या.' लोकांच्या या भावना ऐकून मला माझ्या वर असलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणिव होत आहे.
तसेच चव्हानवाडी गावची दिक्षा मोरे,क्रांती गोगले यांनी राजेंसाठी पत्र लिहून भावना राजेंपाशी सुपूर्द केल्या. पूजा मोरे या धडाडीच्या तरुणीचे सुद्धा आभार.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा