जय जिजाऊ ,
सर्व मराठा युवक युवती ,
विद्यार्थी विद्यार्थिनी ,
सर्व इच्छूक उमेदवार ..
मित्रांनो/ मैत्रीणींनो ,
जय जिजाऊ .
काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या खात्यातील नोकर भरती करण्यात येणार असल्याचे दररोजच्या बातम्यात जाहीर केले जात आहे . यातील काही पदे एम पी एस सी च्या तर काही पदे पोलीस इत्यादी त्या त्या खात्यामार्फत भरल्या जाणार आहेत . महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षणानुसार एससी एसटी ओबीसी व इडब्लूएस असे एकूण ६२% आरक्षण लागू राहील . कोणत्याही क्षणी जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात येईल .
या परिस्थितीत मराठा उमेदवारांनी आरक्षण मिळणार नाही याची तमा न बाळगता किंवा काळजी न करता सोयीनुसार खालील प्रमाणे तयारी सुरू करावी .
(१) ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या गावातील पूर्वजांचे पूर्ण रेकॉर्ड शोधून कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी हे जात दाखले मिळत असतील तर मिळवावेत . तसे झाले तर ओबीसी आरक्षण मिळू शकते . जाहिरात येण्यापूर्वी हे काम हाती घेण्यात यावे . आजकाल काही लोक हे काम काही मोबदला घेऊन करून देतात . कृपया परिक्षा पूर्व तयारी सोडून यामागे लागू नये . त्यात बराच वेळ जातो .
(२) सर्व मराठा युवकांनी ओपन मधील जागा मिळवण्यासाठी धडपड सुरू केली पाहिजेत . ओपन वर्गातील ब्राह्मण व इतर जातींतील उमेदवार कमी असतात . ही संधी समजून तयारीला लागावे .. ३८% मधील जास्तीत जास्त जागा मराठा उमेदवारांना मिळाल्याच पाहिजेत .
(३) जे जे मराठा उमेदवार इडब्लूएस - आर्थिक मागासलेपण चा लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्यांनी सर्व दाखले काढून घ्यावेत . ह्या सर्व जागा मराठा उमेदवारांनी ओढून आणल्या पाहिजेत .
(४) मराठा उमेदवारांनी सर्व लक्ष्य पूर्णपणे फक्त परिक्षा , मुलाखत यावरच केंद्रीत करावे . अभ्यासक्रम समजून व तपासून घ्यावे . पुस्तके नवीन आवृत्त्या वापरा . कारण जे युवक सिनिअर आहेत त्यांना नवीन अभ्यासक्रम पूर्ण माहीत नसतो .
(५) खास मराठा उमेदवारांना लागू असलेल्या सर्व आर्थिक व इतर सवलती माहीत करुन घ्या व ज्या ज्या मिळतील त्या त्या घ्या .
परिक्षा फॉर्म भरण्यापूर्वी अत्यावश्यक पात्रता पूर्णपणे समजून घेणे . त्याची खातरजमा करून घ्यावी .
उमेदवारांनी घाबरू नये . तसेच कोणताही ताणतणाव घेऊ नये . अगदी शांतपणे व पूर्ण आत्मविश्वासाने परिक्षा वा मुलाखत यास सामोरे जावे . स्पर्धा जीवघेणी आहे हे खरे असले तरी जागरण न करता , उपाशीपोटी न राहता , चिडचिड न करता , शिखर गाठायचेच यासाठी तयारीला लागा .... याच क्षणापासून पुढील वेळापत्रक तयार करायला घ्या . वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते ..
(६) जे जे मराठा उमेदवार नोकरीच्या तयारीला लागले आहेत . त्यांनी फायनल परिक्षा होईपर्यंत कोणत्याही आंदोलनात वा तत्सम कारणासाठी वेळ देऊ नये . तसेच जून्या आंदोलनात सहभागी झाल्याने वा इतर कारणांमुळे पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल झालेली असेल तर ते प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत किंवा न्यायप्रविष्ट असेल तर तोंडी मुलाखत पूर्वी सखोल माहिती घेऊन ठेवावी ..
(७) मित्रांनो मैत्रीणींनो युवकांनो , सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृपया परिक्षा पास करण्यासाठी किंवा नंतर तोंडी मुलाखत देण्यासाठी वा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही कोणत्याही अन्य मार्गांचा अवलंब करू नका . एम पी एस सी सदस्य वा कोणत्याही मंत्री आमदार खासदार अधिकारी दलाल यांच्यामागे लागू नका . कोणालाही पैसे देऊ नका . पैसे कबुल करू नका . यात तुम्ही अमूल्य वेळ वाया घालवत असता हे लक्षात घेणे . त्या वेळेत अभ्यास पूर्ण होतो . तेंव्हा कृपया या क्षेत्रात घुसलेल्या सर्व दलालांपासून दूर व सावध राहा ही विनंती आहे . ही बाब सर्वच वर्गातील उमेदवारांनी ध्यानी मनी ठेवावी . पालकांनी आपल्या पाल्यांना जमेल तसे बळ द्यावे . चिडचिड करून मुलांचे मनस्वास्थ्य बिघडवू नये हीच अपेक्षा आहे .
++ तेंव्हा चला उठा नि गंभीरपणे तयारीला लागा . हिंमतीने सर्व तयारी करावी . जर काही कारणाने विचारणा करावी वाटली तर खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा .
खूप खूप सदिच्छा ....
पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
मोबाईल -९४२२०४६९९७ &
९८२३६९३२२७ What's App
Email...
pkhedekar.mss@gmail.com
Date - 14 July 2021 .
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा