ads header

तलाठी महापदभरती - २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गातील तब्बल ४४ मराठा उमेदवारांना न्याय



मराठा विचारमंच महाराष्ट्र राज्य च्या पाठपुराव्याला यश ! 

तलाठी महापदभरती - २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गातील तब्बल ४४ मराठा उमेदवारांना न्याय !

   तलाठी महापदभरती - २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या पण न्यायलयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्या होऊ न शकणाऱ्या तब्बल ४४ मराठा उमेदवारांना जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून नजरचुकीने निघालेल्या चुकीच्या आदेशामुळे तलाठी पदापासून वंचित रहावे लागले असते . प्रसंगावधान राखून मराठा विचारमंच महाराष्ट्र राज्यच्या  पदाधिकार्यांनी आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील , सातारा लोकसभा मतदारसंघाचे  खासदार श्रीनिवासजी पाटील यांच्याकडे  केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि जिल्हाधिकारी सातारा यांनी शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले असून मराठा उमेदवारांना नवे EWS प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिली असून ११/०७/२०२१ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा