ads header

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपकडून ऐनवेळी समरजीत घाटगेंना आयत्या आंदोलनात उतरविण्याचा केवीलवाणा प्रयत्न

marathaarkshanrajewar


मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत राज्यभरातील संपूर्ण मराठा समाज, सर्व समन्वयक व संघटना खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या एकछत्री नेतृत्वाखाली एकवटला असताना काही राजकीय पक्षांकडून मात्र जाणीवपूर्वक सवतासुभा मांडण्याचे प्रकार होत आहेत. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरलेली असताना, 

कोल्हापूरात भाजपकडून ऐनवेळी समरजीत घाटगेंना आयत्या आंदोलनात उतरवणे हा त्यातलाच प्रकार ! 

वास्तविक मराठा समाजाचे नेतृत्व तत्त्वतः जरी संभाजीराजेंकडे असले, तरी राजेंनी नेहमी मी केवळ चेहरा असून समाजाचे नेतृत्व समाजच करीत असल्याचे सांगत विनम्रपणे नेतृत्व नाकारण्याची निस्वार्थ भूमिका घेतलेली आहे. मात्र तरीही मराठा समाज संभाजीराजेंकडे आपला नेता म्हणून पाहतो, याला केवळ त्यांचे 'छत्रपती' असणे हे एकमेव कारण आहे, असे कुणाला वाटत असेल तर तो निव्वळ गैरसमज आहे. संभाजीराजे मराठा आरक्षण लढ्यात कालपरवा पासून नव्हे तर, २००७ पासून सक्रिय आहेत. २०१३-१४ साली त्यांनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. ४ एप्रिल २०१३ रोजी सुमारे एक लाखहून अधिक मराठ्यांचा मोर्चा मंत्रालयावर काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व संभाजीराजेंकडे होते. एकमत नसलेल्या मराठा संघटनांना एकजुटीने एका छताखाली आणण्याचे श्रेय संभाजीराजेंकडेच जाते. 

खासदार झाल्यानंतरही संभाजीराजेंनी वेळोवेळी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उठविला. वेळप्रसंगी हाती फलक घेऊन आंदोलनही केले. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर न्यायालयीन लढाईतही संभाजीराजेंनी केलेला पाठपुरावा लक्षणीय आहे. वेळोवेळी संबंधित वकील, अधिकारी, मंत्री यांच्या भेटी घेऊन, बैठका घेऊन संभाजीराजेंनी मांडलेले संदर्भ, भूमिका, त्यांच्या सूचना समाजानेही पाहिलेल्या आहेत. 

रस्त्यापासून ते संसदेपर्यंत आणि मंत्रालयापासून ते न्यायालयापर्यंत सर्व ठिकाणी संभाजीराजेंनी आरक्षणासाठी केलेली धडपड, २०१७ साली मुंबईच्या मोर्चात स्टेजवर जाऊन स्वतः वाईटपणा स्वीकारून समाजाच्या भवितव्यासाठी त्यांनी पत्करलेला राजकीय धोका आणि त्यांची प्रामाणिक तळमळ समाजाने प्रत्यक्ष पाहिलेली आहे. या कारणांमुळेच मराठा समाजाने आपले स्वाभाविक नेतृत्त्व अत्यंत विश्वासाने छत्रपती संभाजीराजेंकडे दिले आहे. संभाजीराजेंनी आपल्या कर्तृत्वाने, विश्वासार्हतेने व दीड दशकांच्या मेहनतीने ते कमविले आहे. संभाजीराजे 'छत्रपती' असणे हे त्यासाठीचे अतिरिक्त कारण मात्र आहे.

असे असताना मराठा आरक्षण लढ्यात कधीही सक्रीय नसणारा, नव्हे ! तर या लढ्याची साधी जाण ही नसणारा एखादा पुढारी भाजपसारख्या मोठ्या पक्षाने या लढ्यात उतरविणे आणि अशा तालुका पातळीच्या पुढाऱ्याची प्रसिद्धी खुद्द देवेंद्र फडणवीसांसारख्या मातब्बरास करावी लागणे, हि गोष्ट हास्यास्पद आहे. समरजीत घाटगे हे वारंवार ते शाहू जनक घराण्याचे वंशज असल्याचाही ठकळपणे उल्लेख करत असतात. किंबहुना मुळ मुद्द्यांपेक्षा आपली हि ओळख सांगण्यावरच त्यांचा अधिक भर असतो. यातून त्यांना नेमका प्रश्न मांडायचा आहे, कि शाहू महाराजांच्या नावाचे भांडवल करून केवळ आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, हे समजण्याइतपत समाज निश्चितच हुशार आहे.शिवाय, हिंदू धर्म परंपरेनुसार शाहू महाराज हे छत्रपती घराण्यात दत्तक येत असताना आपल्या वडिलांचे, जरी ते हयात असले तरी त्यांचे पिंडदान करून, त्यांचे श्राद्ध घालून आले होते. 

याअर्थाने ते जनक घराण्याशी आपले नाते पूर्णपणे तोडत असतात. हिंदू धर्माची प्रथाच तशी आहे ! असे असताना घाटग्यांना शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणवून घेण्याचा अधिकार राहतो का ? हा देखील प्रश्न उरतोच.

संभाजीराजेंसारख्या समाजमान्य, लोकमान्य व राजमान्य नेतृत्वासमोर एक तालुकापातळीवरचा अनुभवहीन व प्रसिद्धीसाठी उतावीळ असलेला पुढारी उभा करण्याची वेळ भाजपवर यावी, यावर भाजपाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. समरजीत घाटगे आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचे स्वतःहूनच सांगतात, याउलट संभाजीराजे मात्र समाजाने देऊ केलेले नेतृत्व नम्रतेने नाकारतात. यातूनच विचारांचा वारसा प्रामाणिकपणे कसा चालवावा, कुणापासून आदर्श घ्यावा, हे जाणकारांनी ठरवावे.....!

साभार सोशल मीडिया 
 

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा