ads header

आरक्षणातलं षडयंत्र ओळखा...!


मराठा बांधवांनो, आरक्षणातलं षडयंत्र ओळखा; समन्वयकांनाच आधी जाब विचारा !




मराठा आरक्षण हे फडणविसांच्या काळात लागु झाला हा टेंबा मिरवणा-याना 50 % च्या वरील SEBC आरक्षण टिकणार नाही हा झटका लवकर पचनी पडणार नाही ! कारण ते मान्य करणे म्हणजेच फडणविस आणि भाजपा सत्तेत असताना दिलेलं आरक्षण फसवं निघालं हे मान्य करण्यासारखं आहे !

आघाडी सरकारने सारासार विचार करून मराठा समाजाला ओबीशी मध्ये समाविष्ट केलं अर्थात 50% च्या आतील आरक्षण दिलं तर फडणविस सह काही समन्वयकांचा पण चेहराच उघडा पडणार आहे, बुरखा फाटणार आहे !

म्हणुनच ही लाजिरवाणी वेळ येऊ नये, मराठा समाजाला ओबीशी मधुन आरक्षण मिळु नये यासाठी काही लाभार्थ्यांना हाताशी धरून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या यासाठी आधी मराठा समन्वयकांना रस्त्यावर उतरवलं गेलं !

पण जसजसा मराठा समाज आपल्या झालेल्या फसवणुकीबद्दल जागृत झाला हळुहळु पेटु लागला तशी सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकु लागली आहे ! कालचा फडणविस यांचा कांगावा हा या वैतागातुनच झालेला आहे !

मराठा बांधवांनो, आतातरी जागे व्हा, आधी आपल्या परिसरातील समन्वयकांनाच जाब विचारा कि ओबीशी मधील आरक्षण का नको ? SEBC आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही आणि फडणविस नक्की काय करत आहात? फक्त राज्य सरकारच्या विरोधात ओरडुन SEBC आरक्षण टिकणार का ? जेव्हा असे प्रश्न आपण विचाराल तेव्हाच समन्वयक योग्य वळणावर येतील आणि मग राजकारणी वळणावर आणता येतील, आधी आपल्यातलेच झारीतील शुक्राचार्य ओळखा, त्यांना जाब विचारा !

# लढा मराठा आरक्षणाचा
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा