इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी 12 डिसेंबर 1942 रोजी गारगोटी कचेरीवर हल्ला करून इंग्रजी राजवट संपुष्टात आणणा-या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन.
या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये नारायण वारके (कलनाकवाडी ता.भुदरगड), शंकरराव इंगळे, करविरय्या स्वामी (कापशी ता.कागल), मल्लाप्पा चौगले, हरीबा बेनाडे (चिखली ता. कागल), तुकाराम भारमल (मुरगुड ता. कागल), नरसु परीट (अक्कोळ ता. चिक्कोडी), परशुराम साळुंखे ( पट्टणकुडी ता. चिक्कोडी), बळवंत जबडे (चिक्कोडी जी.बेळगाव) या क्रांतीवीरांनी पालीच्या ( ता.भुदरगड) गुहेत गारगोटी कचेरीवर हल्ला करण्याचा कट केला.
12 डिसेंबर 1942 च्या मध्यरात्री पालीतुन गारगोटी कचेरीकडे यांनी कुच केली. कचेरीवर हल्ला करतानाच इंग्रज पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना हौतात्म आले. या क्रातीवीरांचे स्मरण व्हावे म्हणून गारगोटी कचेरी समोर हुतात्मा स्मारक आणि क्रांतीज्योत डौलाने उभी आहे. वीर स्वातंत्र्यसैनिकांना त्रिवार मुजरा !
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा