ads header

अमरसिंह जगदाळे सरकार यांचे टपाल तिकीट जारी...!


अमरसिंह जगदाळे सरकार यांचे टपाल तिकीट जारी...!


कोल्हापूर : शाळाबाह्य मुला-मुलींना किमान पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्याची गोडी लावण्याच्या कार्याची दखल म्हणून बहुचर्चित पत्रकार अमरसिंह जगदाळे सरकार यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट भारत सरकारने जारी केले आहे. कर्मवीर डी.आर. भोसले यांच्या शैक्षणिक कार्याचा वसा अमरसिंह राजे यांनी घेतला असून त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. गोवा,राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक  राज्यातील किमान दीडशेहून अधिक मुला-मुलींना किमान पदवी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन राजेंनी दिले आहे. याच बरोबर खेडोपाड्यातील ग्रामीण लोकांना “लेट अमरसिंह ऑल भारत मिडिया लिट्रेसी कॅम्पेन” द्वारा पत्रकारिता व प्रसारमाध्यमातील साक्षरते साठी सुद्धा त्यांची युनायटेड नेशन्सच्या ग्लोबल ट्यालेंट पूलसाठी “मिडिया युथ आयकॉन २०१९” म्हणून ही त्यांची निवड झाली आहे.  त्यांच्या या कार्याची माहिती वर्ल्ड पार्लमेंट चे भारतीय सदस्य डॉ सुधीर तारे यांनी करवून दिली.
राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण खात्याचे अधिकारी कर्मवीर रावबहाद्दूर डी. आर. भोसले यांच्याकडून प्रेरणा घेऊन शाळाबाह्य मुला-मुलींना किमान पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केले.

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा