प्यादं सोडुन त्याचा वजीर शोधायला हवा !
बुद्धीबळ आणि राजकारण यात बरंच साम्य असते, मोठी चाल खेळताना नेहमी प्यादं पुढं केलं जाते आणि त्याच्या आडुन वजीर खेळत असतो तसेच राजकारणात पण चालु असते !
सध्या खुप ठिकाणी मराठा समन्वयक हे सदावर्ते वर गुन्हे नोंद करत आहेत पण एक महत्वाचा मुद्दा दुर्लक्षीत राहतोय तो म्हणजे सदावर्ते हा फक्त प्यादं आहे त्या सुत्रधार वेगळाच असुन तो निवांत आहे कारण सर्वांचे लक्ष फक्त सदावर्तेवर केंद्रीत आहे !
तपासाची चक्रे ही त्या दिशेने फिरायला हवीत, ज्या ज्या ठिकाणी अजुन गुन्हे नोंद होत आहेत त्यामध्ये सदावर्तेचे सुत्रधार शोधा ही मागणी असायला हवी ! सदावर्ते चे 2017 ते 2019 चे call detaila काढायची मागणी असायला हवी! कोण सदावर्ते ला drive करत होते ते समजायला हवं !
सदावर्तेला कोण बोलायला लावत होते, सदावर्तेच्या डोक्यावर हात ठेवणारा तो म्होरक्या कोण ? सदावर्ते फक्त एका हिमनगाचे एक टोक आहे, खरा हिमनग अजुन expose झालेला नाही तो व्हायला हवा ! मराठा समाज, छत्रपती घराणे, संविधान यांचा वारंवार उल्लेख करून सदावर्तेला पुढे करून कोण जातीय दरी वाढवु पाहत आहे ? राजकीय शक्ती आहे कि असामाजिक तत्वे सदावर्ते पाठुन महाराष्ट्रातील समाजव्यवस्था ढासळु पाहत आहे ?
या सर्व गोष्टींचा काटेकोरपणे तपास व्हायला हवा ! सातारा पोलीसांना दिड - दोन वर्ष लागली हे पण लक्षात ठेवायला हवं ! फक्त सदावर्ते वर लक्ष केंद्रित करून वरील सर्व महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष व्हायला नको ! खुप काही बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही !
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा