छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना पानिपत येथील बसताडा या गावांमध्ये झाली.सदर पुतळा हा पुणे जिल्ह्यातील भोर येथील शिवभक्तांनी दिला असून पानिपत येथे बसतडा या गावांमध्ये त्या पुतळ्याचे चबुतरा भूमी पूजन व पुतळा अनावरण झाले आज झाले. पानिपत येथील तिसऱ्या लढाईतील वाचलेल्या मराठा सैनिकांच्या वंशांजाचे महाराष्ट्राशी बंधुत्वाचे नाते वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने हा पुतळा भोर येथील शिवभक्तांनी भेट केला आहे. या पुतळ्याचे अनावरण पानिपत येथील रोड मराठा समाजाचे नेते व अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत (राष्ट्रीय) चे संस्थापक अध्यक्ष श्री वीरेंद्र मराठा व स्थानिक आमदार श्री हरविंदर कल्याण यांच्या हस्ते झाले . महाराष्ट्रातून सर्वप्रथम भव्य स्वरूपातील मूर्ती भेट करण्याचे हे पहिलेच उदाहरण असून पुण्यातील भोर मधील सर्व शिवभक्त व शिव समिती सोहळा आयोजनाचे प्रमुख ,(पत्रकार )श्री निलेश खरमरे जी व त्यांच्या टीमने याकामी मोठे परिश्रम घेतले. त्याचबरोबर समस्त बसताडा गावातील युवा मराठा टीम , व सर्व नागरिक यांनी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्तांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्या वेळी पानिपत, कर्नाल परिसरातील रोड मराठे मोठ्या संख्येने उपस्थित होते!
जय शिवराय जय पानिपत.
श्री मिलिंद दा पाटिल
राष्ट्रीय समन्वयकव मुख्य राज्य संघटक
(अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा