ads header

उद्यापासून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा लालमहाल सर्वांसाठी खुला होणार...

उद्यापासून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा लालमहाल सर्वांसाठी (दिवसभर) खुला होणार...

संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याला यश...



लाल महाल बंद का आहे...!



पाच वर्ष झालं दुरूस्तीच्या कामाच्या नावाखाली 'लालमहाल' बंद आहे, हे सुद्धा एक षढयंत्र आहे. पुण्यासह महाराष्ट्रातून दररोज शेकडो पर्यटक येतात, मात्र त्यांना गेट वरूनच भिकाऱ्यासारखे हाकलून दिलं जाते. पुण्यामध्ये असा एकही प्रकल्प नाही जो सहा महिने किंवा वर्षभरात पूर्ण होऊन तो प्रत्यक्षात सुरू झाला. मात्र पुणे महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे आणि स्थानिकांच्या भटी राजकारणामुळे लालमहाल जाणीवपूर्वक बंद ठेवला आहे. फक्त चुकून कार्यक्रमाला खुला केला जातो. मात्र त्यासाठी आम्हा शिवप्रेमींना महापालिका आणि मनपा प्रशासन यांच्याशी वाद घालावा लागतो. महानगरपालिका प्रशासन व नगरसेवकांकडून एवढा करंटेपणा का दाखवला जातो हे कळायला मार्ग नाही. कुणाच्याही अस्मिता जिवंत नाहीत म्हणून जिजाऊ सह पाच वर्ष झालं कुलपा च्या आत लाल महाल बंद आहे. हे सहन झाले नाहीच.

लालमहाल तुम्ही कुटुंबासह तुम्ही जा किंवा लालमहाल समोर थांबा आणि महिलांना पाठवा अक्षरशः अत्यंत वाईट वागणूक दिली जाते, हे कशाचे प्रतीक आहे...? लाल महाल मध्ये किती आणि कसले काळे धंदे चालतात हे लवकरच आम्ही जगासमोर आणू...! मात्र महाराष्ट्रासह देशाची अस्मिता असणाऱ्या जिजाऊ शिवरायांच्या लाल महालात तुम्ही शिवप्रेमी असा किंवा कुणीही तुम्हाला प्रवेश मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. तिथे असणारे चौकीदार किंवा संबंधित पोलीस तुम्हाला अत्यंत वाईट आणि खुनी-दरोडेखोरासारखी वागणूक देतात हे एकदा प्रत्येक शिवप्रेमींनी अनुभवावे, आम्ही अनुभवले. त्यामुळे लाल महालातील मजूर कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबाला घेऊन हे पुणे (जिजापूर) वसवलं. नंतरच्या काळात शाहिस्तेखानाचे बोटं याच लालमहाल मध्ये कलम (छाटण्यात) करण्यात आली. आज आमचा लालमहल आम्ही शिवप्रेमी म्हणून दुर्लक्ष केल्यामुळे वन बीएचके (1 BHK) वर आलेला आहे. परंतु आम्हाला त्याचा राग येत नाही. पुणे जिल्ह्यात लाल महाल वास्तव केल्यानंतर जिजाऊ शिवराय आणि शहाजीराजे स्वराज्याचे तोरण बांधले आणि नंतर राजगडावर 23 वर्ष वास्तव्य केलं. १३-१४ गडकिल्ल्यांच्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि इतिहासातील संदर्भ (गड किल्ले व ऐतिहासिक संपत्ती) अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. आम्ही आमचा इतिहास विसरलो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणून इतिहासाचं भांडवल करून चुकीचा आणि खोटा इतिहास आमच्या माथी मारला गेला आणि नंतर तो इतिहास आम्हाला संघर्ष करून दुरुस्त करावा लागला...

दुरुस्तीच्या नावाखाली पाच वर्ष झालं लाल महाल बंद आहे. तुम्हाला साधा जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालायची परवानगी नाही, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात राहून काडीची किंमत नाही. जर तुम्ही तिथे गेलात तर पोलिसांच्या शंभर पोलिसांची फलटण तुमच्या अंगावर येते आणि तुम्हाला तुमच्या वर गुन्हे दाखल करण्याची धमकी देते...? कारण साधा हार घालण्‍यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. जयंतीला तर कधीच विद्युतरोषणाई लाल मारला केली जात नाही. स्वागताला अगोदरच चौकीदाराने कुलूप लावलेलं असतं. लालमहालाचे कुलूप उघडणार कधी...? हा साधा सरळ प्रश्न आहे. लाल महालावर कोट्यावधी रुपयांचा खर्च पडला, पैसे खर्च झाले... मात्र 'काम पाच वर्षात काडीचाही झालेलं नाही.' याउलट बसवलेले दोन वर्षापूर्वीचे दरवाजे आज खाली गळून पडत आहेत. सिलिंग'ला भेगा पडलेल्या असल्यामुळे गळून पडत आहे. यासाठीच केला होता का अट्टाहास...? दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण होतील आणि "लाल महालात लवकरच स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांचाही पुतळा लवकरात लवकर बसवला पाहिजे अशी आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार मागणी करत आहोत."

सध्या गड-किल्ल्यांची सह मंदिरं, शाळा आणि सगळ्या गोष्टी खुल्या झाला. पण आमच्या जिजाऊ आजही कुलपातच यात बंद आहेत. कारभाऱ्यांना सगळ्या कामात पैसे (टक्केवारी) मिळते इथे मात्र काही मिळत नाही यामुळे सगळे गप्प आहेत का...? पुणे महानगरपालिका महापौर-उपमहापौर, सगळ्या पक्षांचे गटनेते, सभागृहनेते व संपूर्ण सर्वपक्षीय नगरसेवक खास करून 'महिला नगरसेविका' यांना जर जिजाऊ-शिवरायांचा इतिहास जपता येत नसेल आणि आमचा लालमहाल 'खुला' करता येत नसेल तर या सर्वांनी पुणे महानगर पालिकेच्या सभागृहात बसण्याची किंवा कारभार करण्याच्या लायकीचे (लायक) नाहीत हे लक्षात घ्यावं...

पुणे महानगरपालिकेने लाल महाल तात्काळ खुला केला पाहिजे. लालमहाल दुरूस्ती'चे संपूर्ण काम पूर्ण केले पाहिजे आणि पोलिसांची जाणीवपूर्वक वाढत असलेली दादागिरी ही थांबवली पाहिजे. अन्यथा शिवप्रेमी म्हणून आम्हाला संघर्ष करावा लागेल... कारण साधा 'हार' घालण्याची ची परवानगी जर पोलिस मागत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आणि भयानक आहे. बघा राग आला तर... कारण, खुप वाईट वाटतं होतं...!

(आज पुणे महानगरपालिकेत मनपा अधिकारी व महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांशी संभाजी ब्रिगेड स्टाइलने चर्चा करण्यात आली.)

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिवमती. सारिकाताई जगताप, मंदार बहिरट, विनायक घुले, सचिन जोशी आदी उपस्थित होते.


Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा