'शिवजयंती उत्सव' राष्ट्रीय सण म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात साजरा झाला पाहिजे...
- राजेंद्र डुबल, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, पुणे.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि रयतेचे स्वराज्य निर्माण केलं. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास सुद्धा त्याकाळी संरक्षण केलं होतं. सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील 'शिवराज्य' निर्माण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. प्रत्येक कष्टकऱ्यांना त्याच्या हाताला काम देऊन उत्तम मोबदला त्याकाळी मिळत होता. 'शेतकऱ्यांना पेन्शन देणारा या देशातील सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.' त्यामुळे प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे... असे मत मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष इंजी. राजेंद्र डुबल यांनी व्यक्त केले.
दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आहे. त्यानिमित्त मराठा सेवा संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने 'अल्पबचत भवन, पुणे येथे 'शिवजयंती' निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष व कार्यकारी अभियंता इंजी राजेंद्र डुबल ते होते.
घराघरात शिवजयंती साजरी करण्याचा मराठा सेवा संघाचा संकल्प आहे. शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरात...!! हा विचार घेऊन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व संगीतसूर्य केशवराव भोसले प्रबोधन कक्ष काम करत आहे.
शिवनेरी किल्ल्यावर मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजन्मोत्सव अर्थात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री मा. अजित पवार व खासदार, मा. खासदार, सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजी. विजय घोगरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर व आदी पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बैठकीस मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र डुबल, उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश जाधव, पुणे जिल्हा सचिव महेश घाडगे, कार्याध्यक्ष रधुवीर तुपे, मराठा सेवा संघाचे पुणे शहराध्यक्ष सचिन आडेकर, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, संगीतसूर्य केशवराव भोसले प्रबोधन कक्षाचे संजय बाबळसुरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री दीपक भराटे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, महेश टेळे, निलेश ढगे संभाजी ब्रिगेड चे विविध पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे व इतर कक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थीत होते.
निवड - मराठा सेवा संघ पुणे जिल्हा (पुर्व) उपाध्यक्ष पदी शिवश्री प्रशांत तावरे यांची व पुरंदर तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी शिवश्री चंद्रशेखर गरूड यांची निवड करण्यात आली.' या वेळी मराठा सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष शिवश्री. राहुल घोगरे व उपाध्यक्ष शिवश्री. प्रविण ननवरे उपस्थीत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री दिगंबर (राजेन्द्र) डुबल यांनी मार्गदर्शन केले तर महेश घाडगे यांनी आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती उत्सव घराघरात साजरा झाला पाहिजे हाच संकल्प या वेळी करण्यात आला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा