क्वांटम लीप, गरुड भरारी..!
२० वर्षात मेहनत करून कमावलेले एका वर्षात ९०% पेक्षा जास्त गमवावे लागते. शिवाय स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य पणाला लागून कॉम्पिटिटर च्या समोर जाऊन उभं रहावं लागतं.
कॉम्पिटिटर पुढील सहा महिने हजार किलोमीटर दूरवर स्वतःच्या लोकेशन पासून दूर ठेवतो आणि त्या तरुणाला संपवण्याचा प्लॅन करतो.
केवढा धक्का! केवढं फ्रस्ट्रेशन! केवढा सेटबॅक!
तो ३६ वर्षांचा तरुण आत्महत्या करत नाही...त्या ही परिस्थितीत मनोधैर्य उंचावून आधी त्याची टीम बाहेर काढतो आणि मग स्वतः कॉम्पिटिटरच्या जाचातून सुटका करवून घेतो. पेशन्स ठेवत कंसिस्टंट मजल मारत स्वतःच्या लोकेशनवर पोहोचतो आणि २० वर्षांच्या मेहनतीने उभारलेले जे गमावलं होतं ते पुढील फक्त १ वर्षात पुन्हा कमवतो इतकंच नाही तर कॉम्पिटिटर ला हि मोठे तडाखे देतो..
फ्रस्ट्रेशनचा उपाय सुसाईड नाही तर क्वांटम लीप मध्ये शोधणारा तो ३६ वर्षीय तरुण :
"छत्रपती शिवाजी महाराज"!
आणि तो झालेला सेटबॅक म्हणजे पुरंदर चा तह ज्यात 90% किल्ले छत्रपतींनी त्या औरंग्याला दिले.
चार पाच पावले मागे आले म्हणणे नव्हे तर 20 वर्षे मागे गेले आणि पुढच्या 8 वर्षात 360 किल्ले केले.
क्वांटम लीप, गरुड भरारी हीच असते!
निराश होऊन धोकादायक पाऊल टाकण्या आधी शिवस्मरण करणे
छत्रपतींचा आदर्श समोर ठेवणे ही आज काळाची आणि परिस्थितीची गरज आहे.
पारप्रेषित.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा