मराठा आरक्षण या विषयावर डाॅ. श्री. गणेश नानासाहेब गोळेकर यांनी मराठा समाजाची दशा आणि दिशा दाखवणारे पुस्तक रविवार दिनांक -१८|०९|२०२२ रोजी सोलापूर येथील मराठा आरक्षण परिषदे दरम्यान उपस्थित असताना मला सप्रेम भेट म्हणून दिले होते त्यातील काही मनोगत आपल्या समोर सादर करीत आहे आणि पुढे पुस्तकातील अनुक्रमणिका सूद्धा देत आहे आपण या पूस्तकातील मुख्य मुद्दे अवश्य वाचावीत आणि आपला अभिप्राय द्यावा.
मराठा समाजाची दशा आणि दिशा हे मराठा समाजातील विविध प्रश्नांचा वेध घेणारे पुस्तक डाॅ. गणेश नानासाहेब गोळेकर या आपल्या होतकरू बांधवाने लिहिले आहे. आजच्या प्रगत काळात समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रतिक्षेत असलेले मराठा आरक्षण, आरक्षणावर केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, आंदोलकांना शासनाकडून मिळणारी सापत्नभावाची वागणूक, अरबी समुद्रातील शिवरायांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या स्मारकावरील स्थगिती, तीन मुख्य व ८२ इतर उपक्रम व काही नाविन्यपूर्ण प्रकल्प यावर काम करणारी सारथी संस्था व तिला न मिळालेला न्याय, प्रत्येक जातींची सद्यस्थिती, त्यांच्यातील प्रगती वा अधोगती, कोणती जात मागास आहे व कोणती अतिमागास आहे यांचा अद्ययावत डेटा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता, बदलत्या काळानुसार ॲट्राॅसिटी कायद्यात सुधारणा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी वरदान ठरणारा स्वाभिनाथन आयोग, मराठ्यांच्या इतिहासाचेही होत असलेले विकृतीकरण व ते थांबविण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता यांसह मराठा क्रांती मोर्चातील विविध मागण्यांना मांडण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
समाजाच्या मागण्या भावनिकतेपेक्षा तांत्रिक मुद्द्यावर वास्तविक आणि नि:पक्षपातीपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. फक्त परिस्थितीला दोष देऊन चालणार नाही, तर समाजाची बलस्थाने शोधून समाजाची कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची वृत्ती अधोरेखित केलीली आहे. पुढील पिढ्या शिकवून नोकरी- उद्योग व्यवसायात आणता आल्या तर गतवैभव निश्चित प्राप्त करता येईल असा दुर्दम्य आशावाद त्यांनी मांडलेला आहे. या पुस्तकातील सर्वच मते आपल्याला पसंतीस पडतील असे नाही, पण मांडलेली मते निश्चितच विचार करायला लावणारी आहेत. एका वेगळ्या विषयावर लिहीलेले हे पुस्तक समाजासाठी कार्यरत असणाऱ्यांना, चळवळीत काम करणाऱ्यांना उपयोगी पडेल.
आपला- संभाजी शाहू छत्रपती (खासदार राज्यसभा) न्यू. पॅलेस, कोल्हापूर - ४१६००३(महा.) फोन:- ०२३१- २६६९९४५.
मराठा समाजाची दशा आणि दिशा या पुस्तकात डाॅ. गणेश नानासाहेब गोळेकर या आपल्या बांधवांने मराठा समाजातील व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यात मोठा भाऊ समजल्या जाणाऱ्या मराठा समाजाने इतर समाजाला नेहमीच सहकार्य केलेले आहे. मागासवर्गीयांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे, ठरवलेल्या योजनांचे मोठ्या मनाने नेहमीच स्वागत केले आहे. मात्र काळाप्रमाणे न बदलल्याने मराठा समाजासमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अपूर्ण किंवा अर्धवट शिक्षण, नोकऱ्यांचा अभाव यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच झालेली आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक मुद्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.*न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली कोपर्डीची निर्भया, त्यानिमित्ताने निघालेले जगाला आदर्श ५८ मराठा क्रांती मूक मोर्चे त्या मोर्च्यांसाठी स्वतःहून पाळलेली आदर्श संहिता लाखोंच्या गर्दीतही रूग्णवाहिकेस रस्ता देण्याचा प्रामाणिक वसा, मोर्चे संपल्यानंतर स्वयंसेवकांनी रस्त्यावर केलेली स्वच्छता, लाखोंची गर्दी असूनही कोणाच्याही केसाला धक्का सुद्धा नाही किंवा कोणालाही कोणता त्रास झालेला नाही, कोणत्याही सरकारी किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान नाही. भारतातीलच नव्हे तर जगातील प्रमुख वृत्तपत्रांनी या मोर्चाचे कौतुक केले. जगातील प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली. मात्र यातून मिळाले काय तर मूळ प्रश्न अनुत्तरितच आहेत. न्यायालयीन कचाट्यात अडकलेले आरक्षण, न्यायालयीन वादात अडकलेले अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवरायांचे स्मारक, शेतीमालाला हमी भावासाठी झगडणारे शेतकरी, शिक्षणासाठी महत्वाचा असलेला मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृह आजचा प्रश्न, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सक्षमता, सारथी संस्थेच्या भविष्याचा वेध, पदोन्नतीत खुल्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समस्या, मराठा इतिहासाची व महापुरुषांची बदनामी थांबविण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता, कर्नाटक सीमा भागातील बांधवांवर होणाऱ्या या अत्याचारांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आदींसह मराठा क्रांती मोर्चातील विविध मागण्यांचा मांडण्याचा प्रयत्न डाॅ. गणेश गोळेकर यांनी केलेला आहे. समाजातील अनेक बलस्थाने मांडण्याचा प्रयत्न यातून झालेला आहे. हाती घेतलेले कोणतेही काम काहीही झाले तरी तडीस नेणे या समाजाच्या वृत्तीचा वेध यात घेतलेला आहे.
न्यायालयीन लढाई लढताना मलाही या बाबतीतील अनेक बाबींचा प्रयत्न आलेला आहे.
आपला- श्री. विनोद नारायणराव पाटील याचिकाकर्ता मो.- 9860355555, (मराठा आरक्षण याचिका, देवगिरी प्लाॅट नं. जी- २०, टाऊन सेंटर,संभाजी नगर.)
मराठा समाजाची दशा आणि दिशा पुस्तकातील अनुक्रमणिका खालील प्रमाणे आहेत,
१) कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार?
२) मराठा समाजाच्या प्रश्नांवर राजकीय जोडे सोडून मराठा नेते एकत्र येतील का?
३) मराठा आरक्षणाचे राजकारण
४) मराठा समाजाच्या आरक्षणाचे वास्तव
५) मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा
६) इतरांना जो न्याय तो मराठा समाजाला का नाही ?
७) जातिनिहाय जनगणनेची आवश्यकता -काळाची गरज
८) ॲट्राॅसिटी कायद्यात सुधारणा गरजेची
९) मराठा आरक्षणाचे गु्ऱ्हाळ
१०) आडगळीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक
११) स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी
१२) शांततामय आणि सनदशीर मराठा आंदोलकांना वेगळा न्याय का ?
१३) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)
१४) महापुरुषांचा अवमान थांबविण्यासाठी कडक कायदा गरजेचा
१५) मराठा समाजाची विदारक दशा आणि दिशा
१६) मराठे युद्धात जिंकतात; मात्र तहात हारतात?
- डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर,
(M.A.,B.P.Ed.,SET, Ph.D.),
मोबाईल - 8237115303,
Email - golekarg1979@gmail.com,
प्लॅट नं - २, श्रेयस अपार्टमेंट, ब्राह्मण गल्ली, बेगमपुरा (संभाजीनगर) महाराष्ट्र- ४३१००४.
✍️ - @ क्षत्रियमराठा-रविंद्र.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा