ads header

मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी सारथी संस्थेचे षडयंत्र-शिवाजी कवठेकर


मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी सारथी संस्थेचे षडयंत्र-शिवाजी कवठेकर 

#सारथी #संस्था मराठा समाजाविरुद्धचे षडयंत्र आहे का?-शिवाजी कवठेकर




बीड दि.14(प्रतिनिधी):-2013 च्या कंपनी ऍक्‍टनुसार 2018 मध्ये फडणवीसांनी स्थापन केलेली सारथी संस्था ही मराठ्यांना आरक्षण मिळू न देणाऱ्या नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठीच स्थापन केली, असे आता म्हणावे लागेल. दुसऱ्या अर्थाने, सारथी संस्था हे मराठ्यांच्या विरोधातील षडयंत्र आहे का? अशी शंका आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी व्यक्त केली आहे.
 पत्रकात म्हटले आहे की, 25 जून 2018 ला स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेमार्फत मराठा समाजाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.व शासनाची काहीवेळा नोकरभरतीसुद्धा केली जाते, असा सर्वसाधारण समज होता. पण 25 ऑगस्टला सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या मराठा संघटनांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, या सारथी संस्थेमार्फत फक्त मराठ्यांनाच नाही, तर मराठा-कुणबी व  कुणबी-मराठा असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मदत केली जाते.पण ही गोष्ट मराठा आरक्षणाच्या चळवळीत गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप खटकणारी आहे. कारण तो मराठ्यांना आरक्षण मिळवून देणाऱ्या आंदोलनात पंधरा सोळा वर्षांपासून काम करत आहे.आणि शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मागत आहे. पण या सारथी संस्थेमार्फत ओबीसी आरक्षणात असलेल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मदत केली जाते,जे आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजावर #अन्याय करणारे आहे.कारण#बार्टी व #महाज्योतीसारख्या संस्था ओबीसींसाठी असताना, त्यांना पुन्हा सारथीमध्येही कशासाठी सामील केले आहे? शिवाय, या सगळ्या संस्था उच्च शिक्षणासाठी मदत करतात.पण गरीब मराठ्यांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे.आणि त्यामुळेच मराठा समाज आरक्षण मागत आहे.ओबीसींच्या मुलांना आरक्षणामुळे #शिक्षणासाठी पैसेच लागत नाहीत.ते सहजच उच्च शिक्षण घेण्याच्या पात्रतेपर्यंत पोहचतात.आणि गरीब मराठ्यांची मुलं पैशाअभावी दहावी पास सुध्दा होत नाहीत.त्यामुळे त्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्नच निर्माण होत नाही.आणि मराठा समाजाची जी मुलं उच्च शिक्षण घेण्याच्या पात्रतेपर्यंत पोहचतात, त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर चांगला असल्यामुळे त्यांना ते शक्य होते,अशांची संख्या कितीशी असणार? म्हणजे आरक्षण नसलेल्या मराठा समाजाच्या नांवाखाली सारथी संस्थेमार्फत परत ओबीसींनाच मदत केली जात आहे.मग ही तर मराठा समाजाची मोठीच दिशाभूल आहे.पण ती का झाली आहे? तर सारथी संस्थेची तरफदारी करणारे सगळे मराठयांचेच नेते आहेत.पण ते मराठाविरोधी असणाऱ्या तीन गोष्टी करत आलेले आहेत.पहिली, ते कधीही सामाजिक एकात्मतेच्या नांवाखाली सतत ओबीसींच्या हिताचीच भूमिका घेत आलेले आहेत.दूसरी, ओबीसी प्रवर्गातून मराठयांना आरक्षण द्या, अशी भूमिका ज्यांनी कधीच घेतली नाही.व तिसरी, ते कधीही ओबीसींना दिलेल्या बेकायदेशीर 32 टक्के आरक्षणाबद्दल बोलले तर नाहीतच, पण ते #मराठा समाजाला कळू नये यासाठी ओबीसी नेत्यांना मदत करत राहिले आहेत.पण ते मराठा असल्यामुळे समाजाची आजपर्यंत फसवणूक होत आली आहे. पण आता मात्र इथून पुढे ती होणार नाही. कारण सारथीचे समर्थन करणारे नेते जरी मराठा असले तरी, ते ओबीसी नेत्याच्या दबावाखाली काम करत असतात.आणि ते त्या ओबीसी नेत्यालाच आपला नेता मानतात.कारण ते त्याचे लाभार्थी आहेत.आणि महाराष्ट्रात 1978 ला #शरद पवार हे पुलोदचे मुख्यमंत्री झाल्यापासून, राज्याचा मुख्यमंत्री कोणीही असला तरी राजकारणावर वर्चस्व शरद पवारांसह ओबीसी नेत्यांचेच राहिले आहे.म्हणजे महाराष्ट्रात मराठ्यांचे नेते म्हणून काम करणारे सगळे नेते हे ओबीसी नेतृत्व मानतात. याचा अर्थ, मराठ्यांना महाराष्ट्रात आपला म्हणता येईल असा मराठ्यांचा कुणी नेताच राहिला नाही.आणि  सगळे ओबीसी नेते मराठ्यांना #ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या विरोधात असताना, मराठ्यांना आरक्षण मग कसे मिळणार? #मराठ्यांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करावा.कारण त्या ओबीसी नेत्याने बहुजन बहुजन करून राज्यातील वातावरण खूप जातीयवादी करून टाकले आहे. आणि त्याच्या मदतीला आता आरक्षण देऊन फसवणारे फडणवीस आले आहेत आणि #फडणवीस यांच्या पक्षाचा #डीएनए #ओबीसींचा आहे, असे पत्रकातून #शिवाजी #कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा