ads header

Remembering Good Maharajas"या कृतज्ञतापूर्व कार्यक्रमास युवराज संभाजी छत्रपती महाराज

पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे आयोजित "महाराजांचे स्मरण" या कृतज्ञतापूर्व कार्यक्रमास युवराज #संभाजी छत्रपती महाराज व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात #पोलंड देशातील पाच हजार निर्वासित नागरिकांना #कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ या काळात आश्रय दिला होता. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत व पोलंड सरकारच्या वतीने पोलंडची राजधानी वॉर्सा येथे "Remembering Good Maharajas" या विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज्ञी #संयोगिताराजे छत्रपती, नवानगरचे श्री शत्रुशाल्यसिंहजी यांचे प्रतिनिधी डॉ. मतालिया, पोलंडमधील भारताच्या राजदूत नगमा एम. मलिक आणि आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे उपस्थित होते.
 
यावेळी पोलंडचे प्रतिनिधीत्व राज्यपाल, त्याकाळी छावणीत काळ व्यतीत केलेले दोन नागरिक, भारतातील पोलंडचे राजदूत श्री. अॅडम बुराकोवस्की यांनी केले. 

त्या दोन नागरिकांनी युद्धाची भयानकता, दोन भारतीय महाराजांची उदारता आणि छावणीतील त्यांचे जीवन याबद्दल सांगितले तेव्हा उपस्थितांची मने हेलावून गेली. 
भारतीय #दूतावासाने दिलेल्या आमंत्रणावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी युवराज संभाजी छत्रपती महाराज यावेळी बोलताना म्हणाले,

"...इथल्या अनेक लोकांनी, विशेषत: पत्रकारांनी मला विचारले की, दुसर्या महायुद्धाच्या वेळी हस्तक्षेप करून पोलिश लोकांना मदत करण्याचा निर्णय कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांनी का घेतला ? आणि त्याचे अचूक उत्तर हे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेला, महाराणी ताराराणी साहेब यांनी संवर्धन केलेला आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे चालवलेला हा कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे. स्वराज्याचा- आमच्या #मराठा साम्राज्याचा पायाच अन्यायाविरूद्ध लढण्याचा होता आणि छत्रपती याचा अर्थच लोकांचे रक्षण करणारा असा आहे..
.... आपण या इतिहासाबद्दल बोलत असताना अनेक वेळा निर्वासित छावणी हा शब्द वापरला जातो. मला वैयक्तिकदृष्ट्या असे म्हणताना खूप अवघडायला होते, कारण आमच्यासाठी पोलिश लोक हे कधी निर्वासित नव्हते, ते आमचे अतिथी होते, ते आमचे मित्र होते, ते आमचे कुटुंब होते.... आणि आजही आहेत.
....आज माझे भाषण संपवण्यापूर्वी मला बेने मेरिटो पुरस्काराने सन्मानित केले यासाठी मी पोलिश सरकारचे मनापासून आभार मानतो. मी हे पदक अतिशय अभिमानाने बाळगेन. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी आणि माझ्याबरोबर इथे उपस्थित असलेल्या माझ्या कुटुंबियांसाठी हे आपल्या दोन महान देशांमध्ये निर्माण झालेला सौहार्दाचा एक पूल आहे."
या कार्यक्रमाचे आयोजन #परराष्ट्र #मंत्रालय, भारत सरकार आणि #इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) यांच्यातर्फे संयुक्तरित्या करण्यात आले होते.
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा