भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी ऍड सैरंद्रा डोईफोडे यांचे आज उपोषण...
बीड दि.7(प्रतिनिधी):- 1994 च्या काँग्रेसच्या शरद पवार सरकारमध्ये मंत्री असताना ओबीसींना त्यांच्या आरक्षणपात्रतेपेक्षा दिलेल्या नऊ दहापट आरक्षणाचे खुप वाईट परिणाम मराठा समाजावर झालेत.एक कोटींपेक्षा अधिक पोरं शिक्षणापासून वंचित राहिले.दोन कोटींपेक्षा अधिक पोरं नोकरीपासुन वंचित राहिले. नोकरी नसल्याने मुलगी मिळाली नाही,व त्यामुळे आज मराठा समाजातील 35 शी 40 शी पार केलेल्या पण बिनालग्नाच्या असलेल्या तरुणांची संख्या बीड जिल्ह्यातच दीड लाखाहून अधिक तर राज्यात ती 40 लाखांपेक्षा अधिक असेल,असे 12 डिसेंम्बर 2021(57 दिवस) पासुन ओबीसी आरक्षण दुरुस्तीची याचिका न्यायालयात दाखल करण्याकरिता आंदोलन करणारे आरक्षण बचाव आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांचे म्हणणे आहे.आणि त्यांचे म्हणणे खरेच असेल कारण त्याचे एक उदाहरण माझ्या घरात तर तीसेक उदाहरणे माझ्या गांवात आहेत.म्हणुन मराठा समाजात झालेल्या या दुर्दैवी वाताहतीची जबाबदारी स्विकारून ना.छगन भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा किंवा राज्यातील या कधीच लग्न होऊ न शकणाऱ्या 40 लाखांपेक्षा अधिक तरुणांची जबाबदारी कोणावर? याचे उत्तर द्यावे.तसेच,ओबीसी आरक्षण तत्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ऍड.सैरंद्रा डोईफोडे यांचे दि.8/2/2022, सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत दहा महिला कार्यकर्त्यांसह उपोषण करणार असल्याचे प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलेले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा