ओबीसींच्या अध्यादेशासाठी ना.भुजबळांची तत्परता म्हणजे 28 वर्षांपूर्वी केलेल्या काळ्या कामाची कबुलीच- शिवाजी कवठेकर
2)ओबीसीच्या मुद्द्यावर ना.भुजबळ एकटे पडले. कारण देवेंद्र फडणवीस,बावनकुळे,वडेट्टीवार घाबरले- शिवाजी कवठेकर
बीड दि.2 (प्रतिनिधी):- ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, यासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन ओबीसी नेत्यांपैकी, एकट्या नामदार छगन भुजबळांनी तत्परतेने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे, त्यांनी 28 वर्षांपूर्वी(1994) ओबीसी आरक्षणात आपण केलेल्या घटनाविरोधी काळया कामाची जबाबदारी स्वीकारून कबुली दिल्याचेच द्योतक असल्याचे, आरक्षण बचाव आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या 53 दिवसांपासून (12-12-2021) आम्ही नामदार छगन भुजबळ यांना, त्यांनी 1994 ला काँग्रेसच्या शरद पवार सरकारमध्ये मंत्री असताना, ओबीसी आरक्षण लागू करताना आरक्षणा बाहेरील 70 टक्के (मराठा 33, अल्पसंख्यांक 17 व ब्राह्मण,मारवाडी, लिंगायत, जैन, येल्लम व इतर उच्चवर्णीय 20 टक्के),साडेआठ कोटी लोकांविरोधात जे काळे काम केले होते, त्याची आठवण करून देत आहोत. त्या काळ्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याची कबुलीच आज राज्यपालांची अध्यादेशावर सही घेऊन आल्यानंतर नामदार छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे दिली आहे. नाहीतर, ओबीसी संदर्भात काहीही घडले तरी, राज्यातील सर्व ओबीसी नेते व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आपली प्रतिक्रिया देण्यासाठी धावत-पळत पुढे यायचे.पण काल (एक फेब्रुवारी 22) मात्र, एकट्या नामदार भुजबळ यांनाच यावे लागले.शिवाय, इंपेरिकल डाटा सादर केल्या शिवाय राज्यातील निवडणुकांना परवानगी देऊ नये,अशी मागणी करणारी याचिका आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, असे गेल्या महिन्यात जाहीर करणारे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे व मराठ्यांना ओबीसीमध्ये अजिबात प्रवेश देणार नाही, असे मुजोरपणे व शिरजोरीने सांगणारे मंत्री विजय वडेट्टीवारही काल परागंदा झाल्याचे दिसत होते. याचा अर्थ असा होतो की, 1994 मध्ये लागू झालेल्या या ओबीसी आरक्षणाच्या कायद्यामुळे खुल्या वर्गातील 70 टक्के (साडेआठ कोटी) लोकांपैकी मराठ्यांसह राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक लोकांच्या आयुष्याची धूळधान झाली आहे, हे फडणवीस, बावनकुळे व वडेट्टीवार यांना पटल्यामुळेच ते समोर आलेले नाहीत, हे सिद्ध होते. ना.छगन भुजबळ मात्र खूप प्रसन्न चेहऱ्याने व आपल्या लोकांमध्ये आपण हिरो झालो आहोत, या आनंदात प्रतिक्रिया देताना दिसत होते.आणि ते खरेही आहे, कारण जातीसाठी माती खायची तयारी असलेला नेता बघण्याची इच्छा आहे, अश्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही ना.छगन भुजबळ हे महापुरुष वाटत असल्यास नवल नाही.पण ते ओबीसींसाठी जरी हिरो असले तरी, आरक्षणाबाहेरील साडेआठ कोटी लोकांसाठी ते पूर्ण झिरो झाले आहेत, याचे भान मात्र त्यांना असल्याचे दिसत नाही. आणि त्यांना गेल्या तीस वर्षांपासून ज्यांनी छत्र,सुरक्षा,अभय व प्रतिष्ठा दिलेली आहे, त्या नेत्यांनासुद्धा राज्यातील या साडेआठ कोटी लोकांची भीती आहे, याची नामदार छगन भुजबळ यांना कल्पना दिसत नाही.कारण, त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या 6 टक्के लोकांच्या नाही तर, 70 टक्के लोकांच्या भरोश्यावरच जिंकता येऊ शकतात याची त्यांना जाणीव असल्यानेच तेही कोणी समोर आले नाहीत.या सर्वावर एकच उपाय आहे तो म्हणजे, स्वतः नामदार छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणामुळे पिडीत झालेल्या तीन कोटी लोकांसह मराठा समाजातील बिना लग्नाच्या राहिलेल्या 40 लाख तरुणांची माफी मागून ओबीसी आरक्षण तत्परतेने मागे घेऊन प्रायश्चित्त घेणे एवढाच असल्याचे, प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा