नवीमुंबई : येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुण सध्या महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या चर्चेसंदर्भात तसेच लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटिल साहेब यांचे नाव देण्याकरीता सर्वपक्षीय कृती समितिशी सलंग्न असलेली पंचमहाभूत संघटना यांस जाहिर पाठिंब्याचे निवेदन संभाजी ब्रिगेड वसई विरार महानगरातर्फे महानगरअध्यक्ष शिवश्री प्रदिप मेस्त्री यांच्यातर्फे देण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित पंचमहाभूत संघटनेचे शिवश्री गणेश पाटिल, शिवश्री सर्वेश तरे, शिवश्री. सुशांत पाटिल तसेच संभाजी ब्रिगेडचे शिवश्री संदीप करकरे, शिवश्री विनोद सोनावणे, शिवमती सौ. केतकी किरण दळवी, शिवश्री मितेश सुनेरीया, शिवश्री. मंगेश सोनावणे आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटीलसाहेब हे बहुजन समाजाचे नेते असुन त्यानी त्याचे संपुर्ण आयुष्य समाजाच्या कामासाठी वेचले असुन निस्वार्थपणे बहुजन समाजाची सेवा केली आहे. तसेच नवीमुंबईतील बहुसंख्य शेतकरयाना त्यांच्या शेतजमिनी परत मिळवून देण्याची मोलाची कामगिरी लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटिल साहेबानी केली तसेच असे असंख्य समाजहितोपयोगी मोलाचे कार्य साहेबांच्या कामगीरीत आहे. त्याकारनाणे बहुजनाच्या ह्या महान नेत्याला न्याय देन्याकरिता तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता नवी मुंबईतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटीलसाहेब यांचे नाव देण्याची सदभावना बहुजन समाजाची तसेच जनसामान्याची असुन त्या मागणीला संभाजी ब्रिगेडचे जाहिर समर्थन असुन राज्यसरकारने अतिशय संवेदनशीलतेने आणि जनभावनेचा आदर करुन ही मागणी मान्य करावी अशी मागणी वसई विरारमधील बहुजन समाजाच्यावतीने संभाजी ब्रिगेडचे वसई विरार महानगर अध्यक्ष शिवश्री. प्रदिप मेस्त्री यानी केली.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा