ads header

कमरेला माझ्या हिरा, परि धुंडाळतो मी भ्रमांडी !

 

कमरेला माझ्या हिरा, परि धुंडाळतो मी भ्रमांडी !



माझी साहित्याची आणि साहित्यीकांची गट्टी, मी मुरगुड विद्यालय येथे माध्यमिक शाळेत असतानाच जमली होती. काळम्मावाडीचे माझे प्रवासवर्णन वाचून गुरुजी लेखक विठ्ठल सुतार यांनी त्यात अधिकच भर घातली. बरेच सहित्यीक मला त्यांच्या साहित्यकृती भेट देतात. त्याचे वाचन करून माझे वैयक्तिक मत मी त्यांना देतच असतो. एका प्रसंगाच्या निमित्ताने दै पुढारीला कार्यरत असणारे माझे मार्गदर्शक पत्रकार अग्रज मधुकर भोसले यांनी त्यांनी स्वत: संपादीत केलेला “दलितमित्र, श्री.एस आर बाईत गौरव ग्रंथ” हा भेट दिला. तसे दलितमित्र पुरस्कार प्राप्त अनेक लोकांच्या सोबतचा माझा व्यक्तिगत अनुभव थोडासा वेग़ळा आहे. काहीशा निरुच्छुकपणे मी तो ग्रंथ स्विकारला. हातात एका चित्रपट कथेचा विषय असल्याने सदर ग्रंथ वाचाण्यास वेळ लागला. पण ग्रंथ वाचून मला एका नवीन दलितमित्राचा अनुभव आला.

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले॥

तोची साधू ओळख़ावा

देव तेथीची जाणावा॥


या जगदगुरु तुकोबारायांच्या अभंगातून बाईत सरांच्या कार्याची अनुभुती आली. बाईत सरांचे कार्य नक्किच एका ग्रंथात सामाविणारे नाही. चंदन म्हणून झिजताना त्या झाडाला ज्या सत्याला सामोरे जावे लागते आहे ते मणुष्यरुपाने बाईत सरांना जाणून घेतल्यानंतर जाणवले. हा ग्रंथ जरी बाईत सरांच्या गौरवाला समर्पित असला तरी पांडुरंगाच्या गळ्यातील फुलांचा हार जसा चाफा, केवडा, जाई-जुई, मोगरा, झेंडु, गुलाब, रानफुलांचा विविधढंगी असतो, तसा आहे. राजकिय हेवेदाव्यांसाठी प्रसिध्द असलेलया कागल तालुक्यात असे ही सामाजिक समतेचे चित्रण बघायला मला भेटेल असे मला कधीच वाटले नव्हते. एक मानसोपचार तज्ञ सांगतो की, तुम्हांला जर एखाद्या व्यक्तीविषयी सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्याचे शब्दांकित केलेले विचार वाचा आणि “दलितमित्र, श्री.एस आर बाईत गौरव ग्रंथासाठी ज्यांनी-ज्यांनी आपले विचार मांडले आहेत त्यातुन त्यांचे स्वचरित्रच स्पष्ट केले. तब्बल दोनशेहे चोप्पन पानांचा हा ग्रंथ वैचारीक हिरया-मोत्यांनी ओतप्रोत आहे.

आम्हां घरी शब्दांचेच धन । शब्दांचे रत्नं ॥


या ग्रंथातून मला हभप सचिनजी यांच्याबद्दल देखील आदर वाढला. हभप सचिन पोवार हे सच्चे वारकरी आहेत. ते भागवती वारकरी नाहीत हे सप्रमाण सिध्द झाले. तुकोबांचा वारकरी निडर आणि शिवरायांच्या मावळ्यांसारख़ा शिवबंधनात संस्कारबध्द आहे. हभप सचिनजी अगदी तसेच आहेत. साहजिकच अशा मानसाच्या वाट्याला नकारात्मक वावड्या उठणारच. गडहिंग्लज, संकेश्वर, निप्पाणी, भुदरगड भागातील सत्यशोधकी सत्याग्रही व्यक्तींची ओळख़ या ग्रंथातून होते. आजच्या पिढीतील प्रत्येक नवतरूणांनी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे. पत्रकार मधुकर भोसले यांनी हा ग्रंथ मला देऊन माझ्यावर फार मोठे उपकारच केले. कागल तालुक्यात माझ्या भागातील राजकारणा पलिकड्ची मंडळी मला या इथे भेटली. हा ग्रंथ मुरगुड-निप्पणी-भुदरगड परिसारातील अमुल्य ठेवा आहे. वैचारीक मतभेद कितीही असो पण मनभेद होऊ न देता मैत्रीं कसे फुलते किंबहुना टिकवता येते. हेच या ग्रंथातून शिकायला मिळते. नारायण मारूती माळी यांनी केलेल्या रेखाचित्रणाने प्रसंग बोलका केला आहे. सुरुपलीच्या जे के फोटो यांनी दलितमित्र श्री एस आर बाईत सरांची टिपलेली निर्पेक्ष भावमुद्रा ग्रंथाचे मुख़पृष्ठ उठावदार समर्पक व या गौरव ग्रंथ समितीच्या कार्याला साजेसे समर्थनच करते. या गौरव ग्रंथ समितीच्या अध्यक्षांनी घेतलेले कष्टाची पावती म्हणजेच इतक्या मान्यवरांनी दिलेल्या प्रतिकिर्या होय. काय निवडावे? काय टाळावं? काय महत्त्वाचे ? विषयाची प्राथमिकता? थोरा-मोठ्यांच्या प्रतिष्ठेचा शब्दांचा प्रभाव ? यासाठी दैनिक पुढारीच्या परिसस्पर्शाने पावन झालेले पत्रकार मधुकर भोसले यांच्या संपादन कौशल्याचा या ग्रंथासाठी कस लागला आहे. हे स्पष्ट्च जाणवते. लेखन क्षेत्रातील नवागतांनी संपादकीय अभ्यासासाठी हा ग्रंथ नक्किच चाळावा. ग्रंथाचे प्रूफरिडीग ज्येष्ठ अध्यापक ह.भ.प. पांडुरंग रामचंद्र पाटील (बस्तवडेकर) यांनी केले आहे. आत्ताच्या पिढीला अध्यापन क्षेत्रातील सर आणि गुरुजीतील फरक काय असतो हे हा ग्रंथ वाचल्यावर नक्किच कळेल. १३ ते १६ च्या दरम्यानच्या फ़ोँटसाईजमध्ये येवतीच्या दत्तात्रय कृष्णात पाटील यांनी टाईपसेटींग केल्यामुळे कोणत्याही वयातील आणि कोणत्याही भिंगातील चष्म्याच्या माणसाला हा ग्रंथ सहज वाचता येईल असा आहे. कागलच्या सुप्रसिध्द श्री गहिनीनाथ प्रिंटर्स अ‍ॅन्ड पब्लिकेशन्स या छापख़ान्यात सम्राट सणगरांनी सुबक छपाई करून प्रा. डॉ. अच्युत माने सरांच्या प्रयत्नाला चार चांद लावले आहेत. प्रेरणामुल्य १५० रु. असलेला हा ग्रंथ खरोखरच सामाजिक क्षेत्रात समाजाचे चांगल करु पाहणा-यांसाठी प्रेरणा देणारा आहे. त्यामूळेच स्वागत मुल्य... शुभेच्छा मुल्य हा शब्द न योजता समितीने संपादकांनी प्रेरणामुल्य हा शब्द योजना करून ग्रंथाला संप्रेरक साहित्यच ( Supplementary Boosting Tools) केले आहे. दुनियादारीचा वीट येऊन जेंव्हा कधी मनाला वाटले कि बास आता सत्याच्या आईला न्याय नाही... दलितोध्दार काय कामाचा... तेंव्हा तेंव्हा हा ग्रंथ वाचावा. म्हणजे “सेवा परमो धर्म:” यातील सुख आणि उर्जा कळुन येईल. प्रेरणा मिळेल.
 

ग्रंथ समीक्षण


ग्रंथ : “दलितमित्र श्री.एस आर बाईत गौरव ग्रंथ”

संपादक : पत्रकार मधुकर भोसले (दैनिक पुढारी)

साहित्य प्रकार : व्यक्तीचित्रण (ग़ुणगौरव)

नायक : दलितमित्र श्री.एस आर बाईत आणि १०४

प्रकाशक : श्री गहिनीनाथ प्रिंटर्स अ‍ॅन्ड पब्लिकेशन्स

प्रेरणा मुल्य : फक्त १५० रुपये

प्रथम आवृती : मे २०१८

रेटींग : ५ स्टार

समीक्षक : अमरसिंह राजे

ग्रंथ उपलब्धता : प्रा. डॉ. अच्युत माने, ‘निपाणी, ता. निपाणी जि. बेळगाव’

पत्रकार मधुकर शरद भोसले पोस्ट बस्तवडे ता कागल जि कोल्हापूर

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा