बरोबर शंभर वर्षापूर्वी तत्कालीन मूंबई प्रांतातील शाहू विचाराच्या व्यक्ती नी अनेक वर्तमानपत्र सूरु केली होती. त्यांच्या बोधचिन्हात हमखास शिवछञपती , महाराणी ताराबाईं ची चिञे आसत. या वर्तमान पञातुन कायम शिवछञपतींच्या इतिहासाचा जागर होत आसे मराठ्यांच्या सत्य इतिहासाच्या मांडणी मधे आणि इतिहासाच्या शूद्धीकरणा मधे हि वर्तमान पञे आघाडीवर आसत . छञपती शिवराय , महाराणी ताराबाई ऐवढेच नव्हेतर मराठा इतिहासावरच्या अभ्यासू लेखमाला या वर्तमानपञांची खासीयत होती. प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,महर्षी वि.रा.शिन्दे , रा.ना.चव्हाण ,राजारामशास्ञी भागवत, भास्करराव जाधव,डाॕ.आप्पासाहेब पवार,गो.दा.दळवी,क्षाञजगतगूरु, डाॕ.बाळकृष्ण ,केशवराव जेधे, बाबूराव यादव अशा आनेक दिग् ज इतिहास संशोधकांच्या आभ्यासू लेखांनी हि वर्तमानपञे खचाखच भरलेली असायची .या वर्तमान पञानीच शिवरायांचा इतिहास खर्याआर्थाने पून्हा ऐकदा जनमाणसात पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.अशी स्वतःच्या मूखपृष्ठावर नावाच्या मधे शिवछञपतींच्या प्रतिमेला स्थान देणारी वर्तमानपञे आज आहेत का?
इंद्रजीत वसंतराव सावंत,
25/4/2020,
कोल्हापूर.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा