मरीनड्राइव पोलीस स्टेशनचे पीआय कदमसाहेबाकडून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांचे मंत्रीमंडळ यांचे विरोधात योगेश पवार यांनी केलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी सुरू
सोलापूर -: सन 1968 मध्ये मराठ्यांना बेकायदेशीरपणे ओबीसी आरक्षणातुन बाहेर काढून मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण अन्य जातीना देवून, मराठ्यांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवून मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांचे मंत्रीमंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावी, यासाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी मुंबई पोलीस यांचेकडे ऑनलाइन तर मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांचेकडे मेलव्दारे तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने मरीन ड्राइव पोलीस ठाणे, मुंबई येथील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम सो., हे चौकशी करीत असून पीआय साहेबानी तक्रारदार योगेश पवार यांस फोन करून अर्जाच्या चौकशीकामी व जबाब देण्यासाठी बोलविल्यावर छावाचे योगेश पवार यांनी सविस्तर लेखी जबाब आजरोजी पोस्टाने पाठविला.
मुंबई पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला नाहीतर, तर मात्र मुंबई येथील मा. कोर्टात खाजगी फिर्याद दाखल करणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा