शुभेच्छा संदेश संपले असतील तर आता समाजाच्या प्रश्नावर या...
मराठा समाजातील मेडिकल/इंजिनियरींग ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो/ पालकांनो इकडे लक्ष द्या
दिनांक 28 जुलै 2020 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीला आर्थिक मागासलेले प्रवर्गाचे आरक्षण घेता येणार नाही.
मेडिकल प्रवेशाकरिता अनेक मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आर्थिक मागासलेल्या प्रवर्गातून म्हणजेच ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केलेले आहेत. अनेकांनी त्याचे प्रमाणपत्र देखील काढलेले आहे. मात्र दिनांक 28 जुलै 2020 रोजी च्या शासन निर्णयानुसार मराठा समाज ई डब्ल्यू एस प्रवर्गा करिता पात्र नाही. कारण मराठा समाज हा एस ई बी सी प्रवर्गामध्ये मोडतो. त्याला फक्त स्थगिती आलेली आहे तो प्रवर्ग रद्द झालेला नाही.
त्यामुळे काही विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले होते. खंडपीठाने फक्त दोन विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश निश्चित करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदरील आदेश सर्वच विद्यार्थ्यांना लागू होत नाही. त्यामुळे मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केलेले आहेत त्यांनी आपल्या प्रवेश निश्चिती करिता तात्काळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे.
कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या मराठा विद्यार्थी परिषदेत "मेडिकल व इंजिनियरींग प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनी तसेच निवड होऊन देखिल नियुक्तीपत्रं न मिळालेल्या मराठा उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी" असे आवाहन करण्यात आले होते . पण मराठा पालक, मराठा विद्यार्थी , मराठा उमेदवार यापैकी कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
अजूनही वेळ गेली नाही . वरीलपैकी मराठा पालक, मराठा विद्यार्थी, मराठा विद्यार्थ्यांनी पुढील नंबर्सवर तात्काळ संपर्क करावा.
अॕड दिपक थोरात
9766599999
अभय चव्हाण
9764044567
विवेक कुराडे पाटील
9637549401
#Maratha Reservation
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा