पोनि संजय मोरे यांच्या गुड गव्हरर्न्समुळे कोल्हापूर पोलिसांच्या प्रतिष्ठेत चार चाँद !
एका आठवड्यापुर्वी मला
माझ्या मित्राचा कॉल आला. पलिकडील व्यक्तिने जी माहिती दिली ती धक्कादायक होती. नुकत्याच
सुखी जीवनाची सुरुवात केलेल्या नवदांम्पत्याची संसारवेल वाढण्या अगोदर खूंटण्याची वेळ
येऊन ठेपली होती. ग्रामीन भागात राहनारा गोविंद कुलकर्नी (बदलेले नाव)हा केंद्र सरकारच्या
एका गोपनीय प्रोजेकट वरील नोकरीत होता. त्याच्या पत्नीने सोशल मिडीयावर अनोळख़ी मैत्रीणीची
रिक्वेस्ट स्विकारली होती. गोविंद कुलकर्नी बाबत मोघम माहिती विचारत विचारता तिचे मॉर्फ
केलेले नग्न फोटो व्हायरल करेल अशी बतावणी केली. केस सरळ-सरळ फिशिंगची होती. पण झाल्या
प्रकरणामुळे ती नववधू घाबरुन-गांगरुन गेली. ह्यात गावातील बाब म्हणजे अब्रुचा पंचनामाच ! काय
करावे हे तीला सुचत नव्हते. शेवटी धाडस करुन तीने आपल्या पतीला घडली हकीकत कथन केली. गोविंदने ही बातमी आपल्या
वरिष्ठांच्या कानावर घातली. वरिष्ठाने त्याला ताबडतोब दिल्लीवरुन गावाकडे पाठविले.
गावाकडे लॉकडाऊन असल्याने सक्तिने त्याला 14 दिवस कोरोंटोइन केले. रिपोर्ट नेगेटिव्ह
आल्यावरच त्याला गावात प्रवेश देण्यात आला. सिनियरने दिलेली वागनुक, प्रवासातील
दगदग, त्यात 14 दिवसाचे कोरोंटोइन मुळे त्याला
जाम वैताग आला होता. घरात आल्या आल्या गैरहजेरीत असले चाळे करतेस का म्ह्नुण सनकन त्याने
तिच्या कानाखाली लगावली. सावधान इंडियासारख्या टिव्ही मालिका आणि व्हाट्सअप युनिव्ह्र्सिटिच्या अति वाचनाने त्याच्या
डोक्यात संशयाचा रहेमानी किडा शिरला होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. कुणाकडे काही
बोलु शकत नव्हता. पण काही तरी करणे गरजेचे होते. नाहितर सगळा बिन कामाचा इस्कोट झाला
असता. धाड्स करुन त्याने आपल्या सास-र्याला
सांगितले. मोठ्या सास-याने त्याला समजाविले, पण मनोरंजन म्हणुन बघितलेल्या सावधान इंडीयाच्या
सिरिज त्याला गप्प बसु देत नव्हत्या...वर सिनियरचे कॉल करुन प्रेशर...!
त्याच्या सास-याने गोविंदला मला भेटण्यास सांगितले, प्रसंग बाका
असल्याने स्थानिक औट पोस्ट च्या एएसआय ना कॉल केला. त्यानी सांगितले
ही सायबर क्राइमची केस आहे. एसपी ओफिसला कळवा.
मग मी आमचे मार्गदर्शक रिटायर्ड एसीपी श्री सुरेश नलवडे साहेबांना कॉल केला.
त्यानी सायबर क्राइमचे पोलिस निरिक्षक संजय मोरे साहेबाना याबाबत सहकार्य करणे विषयी
सांगितले. मी त्या तिघाना घेउन एसपी ओफिस गाठले. संजय मोरे साहेबांना भेटुन प्रकरणाची
माहिती दिली. त्यांनी पति-पत्नीचे म्हणणे ऐकुण घेतले. गोविंदला समजावुन सांगितले. पती-पत्नी
दोघांच्यातील संशयाचे मळभ पुरव्यानिशी दुर केले. एकमेकावर विश्वास ठेऊन सुखाने संसार
करा असा अशिर्वाद देउन ह्सतमुख पणे त्यांची पाठवणी केली.
देशाची खरी संपत्ती
ही त्या देशातील ‘कुटूंबसंस्था’ असते. परस्पर विश्वास आणि प्रेमामुळे ह्यात वाढ
होते. पण काही नतद्रष्ट लोकांमुळे
कटुंबातील कलह-अविश्वास वाढतो. ह्यावेळी गरज असते ती अनुभवी वडीलधा-या व्यक्तिच्या
मार्गदर्शनाची आणि धाकाची. जे सायबर क्राइम-कोल्हापुरच्या संजय मोरे आणि त्यांच्या
बरगे, पाटिल या सहका-यांनी केलं. समाजातील एका कुटुंबाला वाचविण्याचे महत्तम कार्य पोलिस
निरिक्षक संजय मोरे आणि त्यांच्या टिमकडुन पार पडले. गुड गव्हर्नंस आणि पोलिस ड्युटी
यातून अशी असावी हे स्पष्ट होते. त्यांच्या या चांगल्या कार्यामुळे कोल्हापुर पोलिस
आणि महाराष्ट्र पोलिस यांच्या प्रतिष्ठेत चार चांद लागले. पोलिसांनी कर्तव्य बजावताना अशाच पद्धतीने समाजातील
सर्वाना मार्गदर्शन करावे. समाज आपला आणि आपल्या सहका-यांचा अत्यंत ऋणी आहे.
पोलिसांचे मनोधैर्य या
सकारात्मक कार्याच्या बातमीने नक्किच वाढेल. म्हणुन हा लेख़ प्रपंच !
करवीर निवासिनी आई
अंबाबाई आणि कुलदैवत जोतिबा आपल्याला भरपुर आयुरोग्य देवो !
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा