जल फाऊंडेशन च्या एकदिवसीय उपोषणाला मोठे यश!
जलसंपदा विभाग मुख्य अभियंता श्री. विजय घोगरे साहेब यांची १५/०२/२०२२ रोजी न्यु मांडवे धरणाला भेट
जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर चे संस्थापक अध्यक्ष श्री नितिन सखाराम जाधव आणि जल फाउंडेशन च्या विशेष सल्लागार प्रज्ञाताई जाधव यांच्या विनंतीवरून जलसंपदा कोंकण प्रदेश मुख्य अभियंता विजय घोगरे साहेब यांनी दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण रखडलेल्या प्रकल्प संदर्भात व्यथा जाणून घेण्यासाठी न्यू मांडवे धरणाची पाहणी केली यावेळी मुख्य अभियंता यांनी अनेक विषयी सकारात्मक बाबींचा विचार करुन उपाययोजना सुचविल्या आहेत. तसेच मी स्वतः जबाबदारी स्वीकारून या प्रकल्पासाठी लक्ष देऊन योग्य तो निधी उपलब्ध करून प्रकल्प कमीतकमी वेळात पूर्ण करीन असे आश्वासन श्री घोगरे सरांनी दिले
पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सर्व सुविधा पूर्वरत करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत बुडीत क्षेत्रात असलेल्या सर्व स्मशानभूमी व शाळा त्वरित बांधून देण्यात येईल .
यावेळी रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सौ वैशाली नारकर, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चिपळूण कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, खेड उप अभियंता श्री.कुणाल डेरे, प्रकल्पाचे ठेकेदार माष्टर कन्स्ट्रक्शन ठाणे यांचे मालक आणि सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच
जल फाउंडेशन चे (संस्थापक अध्यक्ष) नितिन जाधव , (विशेष सल्लागार) प्रज्ञाताई जाधव, सुधीर दादा भोसले (चिपळूण) श्री गणपत जाधव (समाजसेवक) सुधाकर कदम, अशोक शेलार, राजेंद्र कदम , गजानन मोरे, सुनिल मामा शिंदे , विश्वास कदम , ना बा शेलार , राजेंद्र शेलार , कृष्णा शेलार , कैलास कदम , रघुनाथ कदम , या सगळ्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक दौरा सुरळीत पार पडला
अशी माहिती जल फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा