ads header

डॉ. वैशाली संजय पाटील यांच्या कार्याचा हा मागोवा... 'वैशाली' म्हणजे संस्कृत मध्ये 'महान'

श्रमिक विद्यालय बानगे शाळेतील आठवी नववी व दहावी मधील किशोरवयीन मुलींशी "सवांद फक्त विद्यार्थिनीशी" या सत्रात आदरणीय Dr. वैशाली पाटील कौलगे व आदरणीय वैशाली पाटील बस्तवडे यांनी मुलींशी त्यांच्या काही नाजुक विषयांवर संवाद साधला. वयात येताना शारीरिक व मानसिक होणारे बदल, शारीरिक जडणघडण त्याच बरोबर Periods दरम्यान होणारे त्रास, ताण व समाजात असणारी अंधश्रद्धा अश्या अनेक विषयांवर भांबावून गेलेल्या मुलींशी खूप प्रेमळ व तेवढ्याच ठाम शब्दात अनेक विषय Doctor मॅडमनी हाताळले. असे विषय निघाले की मुलींनी लाजने सोडून, खाली मान न घालता ताठ मानेने बसले पाहिजे. ताठ मानेने बोलले पाहिजे... आपण मुली असलो म्हणून काय झालं आपण कश्यातही मागे राहायचं नाही.. असे मुलींना बजावून सांगितले… मुलींचे प्रश्न देखील अचंबित करणारे होते. "सोळावं वरीस धोक्याचं?"असे का म्हणतात हा प्रश्न एका मुलीने विचारला होता. ह्या विषयांवर आम्ही मुलींशी खुप मोकळं बोललो… नको त्या आकर्षणना व प्रलोभनांना बळी पडू नये. असे मौलिक मार्गदर्शन आज या मुलींना केले. आदरणीय वैशालीताई पाटील यांनीसुद्धा मुलींनी समाजात आपले स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करावे, येणाऱ्या अडचणींना कसे तोंड द्यावे, कसे वागावे कसे रहावे कसे बोलावे याचे खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले.


 डॉ. वैशाली संजय पाटील  यांच्या कार्याचा हा मागोवा...  'वैशाली' म्हणजे संस्कृत मध्ये 'महान' 

 कोल्हापूर येथे डॉ. वैशाली यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९७४ साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण राजर्षी शाहू महाराज हायस्कूल कोल्हापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे झाले आहे. त्यांनी त्यांचे होमियोपॅथीचे वैद्यकिय शिक्षण दसरा चौक, कोल्हापूर येथील सुप्रसिध्द स्व. वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे घेतले आहे. या सर्वच शैक्षणिक संस्था आपल्या विद्यार्थ्यांच्यावर निरपेक्ष निस्सीम सेवादान करण्याचे संस्कार करतात. विद्यार्थी दशेतील या संस्कारात वाढलेल्या डॉ. वैशाली या ७ ऑगस्ट १९९९च्या सुमुहुर्तावर चंदूर येथील डॉ.संजय विष्णू पाटील विवाहबध्द झाल्या.



व्यवसायाच्या निमीत्ताने दोघांनीही कागल तालुक्यातील कौलगे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या इथेच त्यांनी “माऊली जनरल फिजिशीयन क्लिनीक” या  नावाने दवाख़ाना सूरु केला. आज गेली २२ वर्ष कौलगे व आसपासच्या खेड्यांमध्ये उभयतां वैद्यकीय सेवा बजावत आहेत. होमिओपॅथीचे संशोधन आणि विकास करत असताना त्यांची लहान मुलांचे विकार, महिलांच्या समस्या, त्वचा रोग तसेच मानसिक आरोग्य यावर यशस्वी उपचार केले आहेत.  आस-पासच्या ख़ेड्यांमधील किशोरवयीन मुलींना वेळोवेळी शाळांमध्ये जावून आरोग्य विषयक सल्ले देणे, मुलांसाठी पोषक आहार, व्यायाम याचे महत्व पटवून देत आहेत. अंगणवाडीत येणारया स्तनदा मातानां बाळंतपणात घ्यायची काळजी व बाळाच्या आरोग्य विषयी साक्षर केले आहे. डॉ. वैशाली व डॉ. संजय पाटील दोघेही प्रत्येक वर्षी शाळामध्ये विनाशुल्क विधार्थ्यांचे आरोग्य शिभीर घेतात.

कौलगे येथील परिवर्तन सामाजिक विकास सेवा संस्थे मार्फत वेळोवेळी घेण्यात येणारे उपक्रमात स्वयंसेवीका म्हणून त्या हिरहीरीने सहभागी होतात. हे  सेवा कार्य करताना त्या त्यांच्या मान-सन्मानाचा कोणताही अभिनिवेश दाखवत नाहीत. निष्काम सेवा व्रत पूण्य दान म्हणून त्या कार्यरत असतात असे त्यांच्या सहसेवकांच्या कडून समजते. संस्थेतर्फे सन २०१७ -२०१८  या वर्षामध्ये सीमा भागांत आणि कौलगेच्या आसपास असनारे १८ खेड्यांमध्ये तब्बल २५००-३००० महिलांची हिमोग्लोबीन, क्याल्शियमची मोफत तपासणी करून औषध उपचार केले आहेत.  

२०१९ ला कोल्हापूर जिल्ह्यात महाप्रलयच आला होता. या महापुराने ग्रासलेल्या कुटुंबाना डॉ. वैशाली पाटील व डॉ संजय पाटील यांच्या माऊली क्लिनीक परीवारा तर्फे मोफत अन्न-धान्य, औषधे, कपडे याचे वितरण केले आहे. पूर ओसरल्यानंतर पसरणारया साथीच्या  आजारांवर नियंत्रन आणि हे आजार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याचे ही कार्यशाळा त्यांनी घेतली आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या १४ वित्त आयोगा अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य मार्गदर्शन आणि महिलांची तपासणी व औषधे पुरवठा याचे कार्यउद्दिष्ट  २८ फेब्रुवारी२०२१ रोजी त्यांनी पूर्ण केले आहे.



पहिल्या टप्प्यात हिमोग्लोबिन व कॅल्शिअम तपासणी शिबीरासाठी महिलांना प्रवृत्त करणे हेच एक आव्हान होते. कारण 'मला काय झालंय...? व मला काय होतंय...?  असा प्रश्न महिला विचारायच्या..! त्यावेळी महिला टीमने व ज्या त्या गावातील परिवर्तनच्या स्वयंसेवक व संयोजक यांनी याबाबत त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे या शिबिरांना प्रतिसाद मिळत गेला.

अगोदर त्या गावात शिबिराबाबत जागृती केली, त्यांच्या नोंदी घेतल्या.  मग गावातील एखाद्या मंदिरात जाऊन त्या महिलांचे मानसिक प्रबोधन केले. मार्गदर्शन केले. तपासणीसाठी रक्त घेतले. ८ दिवसांनी रिपोर्ट आल्यानंतर त्याचे व्यवस्थित वर्गीकरण करून ज्या त्या महिलेला गरजेनुसार १५ दिवस ते अडीच महिन्यापर्यंतची औषधे दिली गेली. त्यांचे त्यांचे रिपोर्ट पोच केले. पुन्हा-पुन्हा त्या गावात जाऊन, महिलांना एकत्र करून औषधांचे वाटप केले.  काय कसे व किती वेळेवर जेवले-खाल्ले पाहिजे याबाबत व औषधे टाकून न देता ती वेळेवर घेण्याबाबत साक्षर केले.  ज्यां महिलाच्या  रक्तात आदर्श असा हिमोग्लोबिन व कॅल्शियम स्तर आहे त्या महिलांचा फुल देऊन सत्कार केला. असे हे कुटूंब समृद्धी अभियानाचे स्वरूप होते.

 ही शिबिरे जसजशी होत गेली तसे तसे ग्रामीण भागातील आरोग्याचे कटू सत्य डॉ. वैशाली यांना उमजू लागले. त्यातून आलेल्या आकडेवारीवरून आणि रिपोर्ट मधून गांभिर्य आणि उपयोगीता निर्द्शनास आली. ६८टक्के महिलांमध्ये किमान पातळीपेक्षा हिमोग्लोबिन व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते तर ३७टक्के महिला रक्तक्षयाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकल्या होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्तीला कुटूंब समृद्धी अभियानाच्या माध्यमातून कृतीशील वंदन करण्याचा केलेला हा एक प्रयत्न होता.

हे सर्व सेवा कार्य करित असताना डॉ. वैशाली आईची जबाबदारी ही चोख़ पार पाडतात. त्यांनी आपल्या दोन्हीं मुलांना ही सुयोग्य संस्कार दिले आहेत. याचीच प्रचिती म्हणजे त्यांचा मुलगा उत्कर्ष होय. उत्कर्ष सध्या बिडीएस करतो आहे. नुकताच त्याने  सातव्या क्रमांकाने आपला एकडॅमिक करियरमध्ये चढता आलेख ठेवला आहे. एक पत्नी, आई, मुलगी, मैत्रीण म्हणून जबाबदारी पेलतांना त्या नेहमीच हसतमुख़ असतात.   

करियरीस्ट वुमन म्हणून डॉ वैशाली यांच्या ठायी असलेल्या मातृत्वाचे दातृत्व हे अनेक महिलांना उर्जित करणारे आहे.

डॉ वैशाली आपल्याला मराठा क्रांती न्यूज नेटवर्कच्या एबीएस न्युज टीव्हीचा मानाचा मुजरा...!

शब्दांकन : आसावरी अमर जोशी


Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा