मराठा आरक्षणाचा निकाल आज विडिओ कॉन्फरन्स द्वारे देऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट
मराठा आरक्षणाचा निकाल आज विडिओ कॉन्फरन्स द्वारे देऊ शकत नाही.
पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार सुप्रीम कोर्ट
मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर सुनावणी होत आहे. आता १५ जुलैला अंतरिम आदेशासाठी सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्व तयारी केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका आहे. तर हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण चळवळीतील विनोद पाटील यांनी केली आहे. यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाने सरसकट १६ टक्के आरक्षणाऐवजी शिक्षणात १२, तर नोकर्यांत १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश २७ जून रोजी दिला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेल्या आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा