आपल्याला नेहमीच लक्ष्मण किर्लोस्कर यांच्या विषयी आदर आणि अभिमान आहे.त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील आणि सामाजिक योगदानाबद्दल. आपण त्यांची सुरवात एका लहानशा छोट्या कारखान्यातून नांगर निर्मिती करून केली अस ऐकून आहोत.
पहिल्या महायुध्दच्या नंतरच्या काळात किर्लोस्कर यानां हॉस्पिटलच्या कॉट तयार करण्याचे काम मिळाले होते . ते सुरळीत सुरू असतानाच अचानक पने इंग्रजांनी भारतातील सगळा कच्चा माल आपल्याला घेतला आणि तो बाहेरून आणला आहे असं सांगून पुन्हा भारतात जास्त किंमत मध्ये विकू लागले त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योगधंदे डबघाईला आले. त्यामध्ये लक्ष्मण किर्लोस्कर हे सुध्दा होते. तेव्हा काही आर्थिक मदत मिळते का हे पाहण्यासाठी किर्लोस्कर यांचा एक प्रतिनिधी एका राजाला भेटायला आला. त्या प्रतिनिधीने सविस्तर वृत्तांत राजाला सांगितला आणि आर्थिक मदतीची मागणी केली. त्या राजाने आर्थिक मदत करण्यास नकार दिला व सागितले की मी आज मदत केली तर तू जाशील पण ती संपली की परत दुसऱ्याकडे हाथ पसरशिल तेव्हा तू जा व लक्ष्मण किर्लोस्कराना पाठवून दे.
दुसऱ्या दिवशी स्वतः लक्ष्मणराव महाराजांना भेटायला आले. महाराज म्हटले, सध्या पहिला महायुद्धामुळे भयंकर हानी झाली आहे . तेंव्हा आता तरी परत कोणत्याही युद्धाचा प्रसंग येईल वाटत नाही त्यामुळे सध्या हरितक्रांती घडली पाहिजे. शेतकरी नांगरणी साठी फणस, आंबा इत्यादी लाकडा पासून नांगर बनवतात. पाण्यामुळे किंव्हा जमिनीतील एखाद्या दगडाला लागून ते नांगर मोडतात ,तुटतात . पुन्हा नांगर बनवून घेण्यासाठी अथवा दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्याला सुतार च्या शाळेत नंबर लाऊन बसावे लागते. पर्यायाने त्यामध्ये खूप वेळ जातो .काही वेळा तो हंगाम निघून जातो . तुम्ही शेतीची अवजारे , नांगर हा बिडा पासून तयार करा.
ठरल्या प्रमाणे किर्लोस्कर यांनी एक उत्तम नांगरचे ड्रॉइंग महाराजांना दाखवले. पण नांगर तयार करण्यासाठी कच्चा मालाची गरज होती. इंग्रजांकडून कच्चा माल घेणं परवडणार नव्हतं तर इथे कुठे ही कोणत्याही प्रकारच्या खाणी नव्हत्या. अशा वेळेस कोणत्याही प्रकारचे मूल्य न घेता त्या राजाने आपल्या राज्यातील 128 तोफा ह्या किर्लोस्कर ना दिल्या . आणि सागितले की योग्य वाजवी दरात शेतीची अवजारे बनवून शेतकऱ्यांना द्या. त्या तोफांच्या कच्चा मालाच्या जोरावर साडेतीन वर्ष किर्लोस्कर यांच्या कारखाना चालला. तेव्हा भारतातील पहिल्या लोखंडी नांगराचा जन्म झाला. खरच्या अर्थाने हिरत तसेच औद्योगिक क्रांतीची सुरावात भारतात झाली.
शेतकरी , उद्योजक , कामगार , सर्व स्तरातील वर्ग सुखी व्हावा म्हणून स्वतः च्या राज्यातील बहुमोल तोफा देनारे राजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....
टीप : आजही किर्लोसकर उद्योग मुबई ऑफिस च्या येथे एक शिलालेख आहे त्यावर एक नांगर आहे आणि लीहाले आहे हाच तो भारतातील पहिला नांगर छ्त्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....
-अतुल मारुती देसाई (७७४५०८५७५७)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा