अपर्णा रामतीर्थकर: जिवंत मनुस्मृती
तीन दिवसांत तीन माणसं गेली..
त्यात ईरफानला सर्वांची सहानुभूती मिळाली, (मुस्लिम असून..) तर तीर्थंकर बाईने सगळ्यात जास्त शिव्या खाल्ल्या..(ब्राम्हण असून.)
मेल्यानंतरही इतक्या शिव्या खाणारी ही पहिलीच व्यक्ती असावी बहुधा..
ते साहजिकही होतं..
काही जणं कळवळून, 'मेल्यावर तरी वैर संपवावं' म्हणत होती. तरीही लोक शिव्या देतच होते. याचाच अर्थ त्या बाईची कामगिरी ही तितकीच नीचतम होती.
लोक म्हणतात तिचं सामाजिक कार्य बघा...
सामाजिक कार्य केलं म्हणून तिने जे वाईट विचार पेरण्याचं काम हिरीरीने केलं त्याकडे दुर्लक्ष करता येतं का?
'सामाजिक कार्य नको पण तुझे मागास विचार आवर बाई' म्हणायची वेळ आणली होती तिनं.
पण आता मी लिहितेय ते वेगळ्या ऍंगलने..
मला एक प्रश्न पडतोय तीर्थंकर बाईंच्या विचारांबद्दल आणि त्या विचारांच्या प्रचारांबद्दल?
या बाई जातीने ब्राम्हण होत्या.. त्यांचे विचार पुरुषप्रधान समाजाला पूरक असे होते. आणि ते त्या जाहीरपणे मान्य करत होत्या. अर्थात त्यांनी कोणतेही विचार बाळगावेत पण ते दुसऱ्यांवर थोपवू नयेत. निदान इतके मागास विचार तरी... त्याने या शंभर वर्षांत महा मेहनतीने जे स्त्री चळवळीने मिळवले ते या बाईंनी स्त्रियांना शंभर वर्षे मागे नेण्याचा विडा उचलून धुळीस मिळवले...
आधीच विचाराने अजून मागे असलेला समाज असे विचार ताबडतोब ग्रहण करतो . आणि याची जाणीव चलाख ब्राम्हणवर्गाला नसली तरच नवल.. मग हा समाज आपली संस्कृती आणि आपले सांस्कृतिक महत्त्व या बहुजनसमाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात त्यांच्या मुलीसुना अमेरिकेत ओढणी नव्हे, तर 3/4 घालून, (लग्नात नव्हे) तर लिव्ह इन मध्ये राहात असतात.
तर मला जो प्रश्न पडतोय तो असा आहे की या बाईंच्या व्याख्यानांचा, ती व्याख्याने आयोजित करण्यात नेमका कोणता समाज अग्रेसर होता? कुणासाठी त्यांची ही व्याख्याने असत? त्यात हजर असणारा समाज अधिकतर कोणत्या जातीसमुदायाचा असे याबद्दल काही डेटा उपलब्ध आहे का?
मला स्वतःला असं वाटतंय की या बाई जे सांगत आल्या त्यातील एकही विचार ब्राम्हण वर्गातल्या एकाही मुलीने एक दशांश देखील अंमलात आणला असेल असं वाटत नाही. आणतील असंही वाटत नाही.
यांच्या विचारांचा प्रभाव अधिकतर बहुजनसमाजच ग्रहण करत आला असणार याची मला खात्री आहे.
जर बहुजन समाज आजही ब्राम्हण वर्गाकडून जाणीवपुर्वक किंवा अजाणतेपणी काही शिकवलं जातंय त्याला शिरोधार्य समजून तसं वागत असेल, तर मग ब्राम्हण समाजाला शिव्या देण्याचा त्यांचा हेतू कितपत तडीस जातो?
एकीकडे ब्राम्हणाने ज्ञान मिळू दिले नाही म्हणून बोंबाबोंब करायची. अशावेळी या बाई आपल्याला एक सांगतायत, आणि प्रत्यक्षात ब्राम्हण घरातल्या स्त्रिया तर आधुनिक आहेत, स्वतंत्र आहेत, भरपूर शिकताहेत नि आपले निर्णय आपण घेताहेत सर्वच बाबतीत ते बहुजन समाजाला कळत नसेल का?
त्याचवेळी असाही प्रश्न पडतो, की खरंच ब्राम्हणांवर जो आळ लावला जातो, की स्वतः सुधारणांचा मलिदा खायचा आणि बहुजन समाजाला मागास ठेवून आपले वर्चस्व कायम ठेवायचे यात या बाईंचे उदाहरण पाहता तथ्यच वाटते.
बाई कशा बरोबर बोलत होत्या याची तळी सोमावर देखील अधिकतर ब्राम्हणवर्गच उचलताना दिसतोय. यात ब्राम्हण बायकाही मागे नाहीत.
हे जे तळी उचलणारे आहेत? यांच्या घरातल्या स्त्रिया त्या बाईंच्या शिकवणुकीनुसार राहत आहेत का? त्यांचे वर्तन त्यांच्या सांगण्यानुसार आहे का? कारण बाई सांगत होत्या मुलींना शिक्षण कशाला हवं? भाकरी भाजता यायला हवी.? मग यांच्या घरातल्या मुली शिक्षण सोडून बसल्यात का? नोकरी सोडून बसल्यात का?
तर तसं चित्र मला तरी दिसत नाही. नोकरी करीअर सोडून बसलेल्या दिसतात त्या अधिकतर बहुजनसमाजातल्याच स्त्रिया.
हे एकच उदाहरण नाही तीर्थंकर बाईंचं...
अनेक गुरु, महाराज बाबा इत्यादीनी देखील आपल्या संस्कारांचे आणि भारतीय संस्कृतीेचे प्रयोग बहुजनसमाजावरच केलेले दिसतात. प्रत्येकाने यातील एक एक समाज वेठीस धरलेला दिसतो. मग सत्संगं असोत किंवा बैठका... दादा असोत की नाना.. बाबा असो की गुरूजी महाराज...
यांची पद्धतशीर व्यवसाय चालू आहेत. बहुजनसमाजाला भजनी लावायचे. भारतीय संस्कृतीच्या नावावर त्यांना मागास ठेवण्याचे. त्यांच्या स्त्रियांना घरात कोंडण्याचे...
यात मखलाशी असते ती कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आम्ही हे नेक काम करतोय असं भासवण्याची. जी व्यवस्थाच मुळी स्त्रियांच्या पूर्ण शोषणावर अवलंबून होती. तिचं स्वतःचं अस्तित्व पूर्ण पुसून टाकून तिला राबवून घेणारी होती त्या व्यवस्थेला आत्ता कुठे स्त्रिया जरा जरा प्रश्न विचारू लागल्या होत्या आणि ती विवाह व्यवस्था किंवा कुटुंबव्यवस्था झटकण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याची जाणीव ज्या चलाख लोकांना आली त्यानी स्त्रियांच्या भावनांना अशा तऱ्हेने हात घालायला सुरुवात केली, बाई गं तू तर लक्ष्मी, बाई तू तर अन्नपुर्णा, तू सरस्वती... तू घराबाहेर पडून कसं चालेल? तुला संस्कार संस्कृती कसं सोडून चालेल? मूल नको म्हणून कसं चालेल? तुझ्यावर तर सारा समाज अवलंबून.... ब्ला ब्ला ब्ला...
हे सोपे फंडे आहेत, ग्रामीण, पारंपरिक, शिक्षित, अर्धशिक्षित आणि अशिक्षित लोकांच्या मनावर परीणाम करण्यासाठी.
लोकांना संत परंपरेतल्याच त्याच जुनाट शिकवणुकी देऊन त्यांना ठेविले अनंते तैसेचि राहावे, शिकवण्यात हे सगळे ब्राम्हणी पंथ आघाडीवर आहेत. त्यांना कर्मवादी न बनवता दैववादी बनवून आणि त्यांच्या हातात पारायणांसाठी एकेक पोथी टिकवून चलाखीने आपण समाज सुधारणा करतोय, सामाजिक कार्य करतोय असा आव आणून मोठमोठे पुरस्कार देखील सामाजिक कार्याच्या नावावर लाटले जातात...
यात ब्राम्हण महाराज किती? आणि बहुजन समाजातले महाराज किती?
ऐकणारे कोण? त्यांचे पालन करणारे कोण? शिकवणारे कोण? याचा डेटा काढायला हवा. हा अभ्यास करून त्यावर चिकित्सात्मक लिहिले जायला हवे आणि लोकांचे प्रबोधन व्हायला हवे या बाबतीत.
नंतर चार पिढ्या गेल्यावर पुन्हा मग हाच समाज बोंबलेल... आम्हाला ब्राम्हणांनी मागे ठेवले.... आमच्या स्त्रियांना अशिक्षित ठेवले.
दुनिया झुकती है... झुकानेवाला चाहिए.... तुम्ही झुकत असाल तर दोष तुमचा आहे.... आधी गुन्हेगार तुम्ही स्वतःचे स्वतःच आहात....
अलका गांधी-असेरकर
उगीच नाही अपर्णा रामतिर्थकर बाई "जिवंत मनुस्मृती " म्हणून प्रसिद्ध होत्या .
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा