#साष्टी #पिंपळगाव #ग्रामस्थांच्या #आंदोलनाला #नाशिककरांचा #कृतीशिल #पाठींबा
मराठा क्रांती मोर्चातर्फे दोन हजार किलोचा शिधा रवाना
मराठा समाज बांधवाना हक्काचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टे पिंपळगावचे समस्त गावकरी एकवटले असून २० जानेवारीपासून बेमुदत आंदोलनास बसले आहेत.त्यांना अवघ्या महाराष्ट्राने पाठींबा द्यावा असा संकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली शहर क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला असून आंदोलनाचे नैतिक धैर्य वाढविण्यासाठी जवळपास २००० किलोचा शिधा साष्टी पिंपळगावकडे रवाना केला आहे.
केंद्राने तीन कृषी कायदे मंजूर केल्यानंतर पंजाब हरीयाना राज्यातील शेतकऱ्यांनी साठहून अधिक दिवस कृषी कायाद्याविरूध्द छेडलेल्या आंदोलनाला देशभरातून शेतकरी विविध मार्गाने पाठींबा देऊ लागल्याने या कृषी आंदोलने राष्ट्रव्याप्ती गाठली आहे,त्यातूनच या आंदोलनाची धार वाढली आहे याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आपले हक्क पदरात पाडून घेण्यासाठी साष्टी पिंपळगावचे तरूण तरूणी,स्रीपुरूष जेष्ठ नागरिकांसह चिमुकलेही सहभागी झाले आहेत.हे गाव सकल मराठा समाजासाठी पोटाला चिमटा घेऊन रस्त्यावर बसले आहे या आंदोलनाची तिव्रता वाढवून त्याचे चटके केंद्र आणि राज्य सरकारमध्ये बसलेल्या मराठा द्वेषी व्यवस्थेला बसले तर आणि तरच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल या हेतूने सकल मराठा समाजाने साष्टी पिंपळगावच्या आंदोलनाला सढळ हाताने मदत करून पाठींबा देणे काळाची गरज ठरली आहे,त्याचा शुभारंभ नाशिककरांनी केला असून आज रविवार दि.२४ जानेवारी रोजी १००० किलो तांदूळ,२०० किलो तुरडाळ,१०० किलो चवळी,१०० किलो रवा,१५० किलो कांदे,८० किलो हिरवे वाटाणे,५० किलो बटाटे असा जवळपास दोन हजार किलोचा शिधा घेऊन गाडी साष्टी पिंपळगावकडे रवाना केली.मराठा क्रांती मोर्चाचे आधार स्तंभ राज्य समन्वयक करण गायकर,राज्य समन्वयक तुषार जगताप,गणेश कदम यांनी शेकडो मराठा समन्वयकांच्या साक्षीने शिधा घेऊन जाणाऱ्या गाडीला श्रीफळ वाढवून हिरवा ध्वज दाखवला.
पंचवटी कांरजास्थित छ.शिवाजी महाराज पुतळ्यावर झालेल्या या छोटेखानी सोहळ्याला सचिन पवार नीलेश मोरे ,गणेश कदम, शरद लभडे ,शाहू पवार , विलास जाधव,योगेश कापसे, चेतन शेलार ,किरण पाणकर ,नरेश पाटील, कुणाल भवर, अमित नडगे,बलीनाना गडवाजे ,बापूसाहेब चव्हाण, संतोष पेलमहाले, ज्ञानेश्वर भोसले, राकेश सूर्यवंशी, सचिन शिंदे, पिंटू दहिवड, गौरव पवार,राजेश कदम,आदी मराठा समन्वयक आवर्जून उपस्थित होते.
साष्टी पिंपळगाव या छोट्याशा खेड्यातून सकल मराठा ग्रामस्थांनी चेतवलेली आंदोलनाची ही ज्योत मराठा आंदोलनाचा मार्ग उजळविणारे ठरणार आहे.या ज्योतीकडे नादान मराठा द्वेषी व्यवस्थेने दुर्लक्ष केल्यास या ज्योतीचा वणवा भडकण्यास वेळ लागणार नाही.भडकलेल्या ज्योतीच्या ज्वाला तमाम मराठा द्वेषी शक्तीची राख केल्यानंतरच विझेल.या ज्योतीला सतत पेटते ठेवण्यासाठी सकल महाराष्ट्र मराठा समाजाने तन मन धनाने या आंदोलक गावाच्या मागे उभे राहून शक्य तेव्हढी मदत करावी असे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा